महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:58 PM2018-03-23T17:58:38+5:302018-03-23T17:58:38+5:30
सर्वच समित्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात समितीवर प्रत्येक पक्षाचे सदस्य देण्यात येतात.
पुणे: महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यपदी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सर्वच समित्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात समितीवर प्रत्येक पक्षाचे सदस्य देण्यात येतात. महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यामध्ये विधी समिती, शहर सुघारणा समिती, महिला बाल कल्याण समिती आदी समित्यांचा समावेश आहे.
समितीचे नवनियुक्त सदस्य खालील प्रमाणे :
विधी समिती भाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे,
राष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप,काँग्रेस: रफिक शेख, शिवसेना : बाळा ओसवाल
.................
शहर सुधारणा समिती
भाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगे
राष्ट्रवादी : भैय्या जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर
काँग्रेस: अविनाश बागवे, शिवसेना : विशाल धनवडे
----------
महिला व बालकल्याण समिती
भाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेख
राष्ट्रवादी : अमृता बाबर,अश्विनी भागवत, परवीन शेख
काँग्रेस : चांदबी हाजी नदाब,शिवसेना : श्वेता चव्हाण
--------
क्रीडा समिती
भाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटील
राष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळे
काँग्रेस : अजित दरेकर,शिवसेना : प्राची आल्हाट
या सर्व नगरसेवकांची पालिकेच्या विविध समित्यांवरती निवड करण्यात आली.