शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुळशी तालुक्यातील शाळांमध्ये निबंध , चित्रकला , पीपीटी व्हिडीओ तयार करणे, वक्तृत्व,रांगोळी, गायन, वादन, एकपात्री नाट्य अभिनय, रोबोटीक मॉडेल मेकिंग, ऑनलाईन व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा, शुभेच्छा पत्रलेखन,काव्यलेखन, सायकलिंग, रानींग, वॉकिंग, सुर्यनमस्कार,वृक्षारोपण आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
पिरंगुट येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मास्क वाटप व ग्रंथप्रदर्शन असे उपक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चांगदेव पवळे होते. याप्रसंगी सुवर्णा नवाळे, विकास पवळे, प्रवीण कुंभार,राहुल पवळे, भिमाजी गोळे, ज्ञानेश्वर पवळे, महादेव गोळे, उपप्राचार्य आर.एम.कुसाळकर,पर्यवेक्षिका एस.जे डोंगरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ९ वी ते १२ वी चे विदयार्थी उपस्थित होते.
प्राचार्य एच.टी. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन अमृता खराडे यांनी केले तर आभार सोमनाथ कळमकर यांनी मानले.
--
१६ पौड शाळेय स्पर्धा
फोटो : न्यु इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेज मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करताना पिरंगुट ग्रामपंचायत पदाधिकारी व शाळेचे कर्मचारी