पोलीस मित्र संघटना
चंदन नगर पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नारळ देऊन सत्कार केला. तसेच श्री हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांचाही सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक संगीता काळे, रवी आहेर, पांडुरंग नाणेकर, किरण पलांडे, डॉ. रश्मी वीर, डॉ. अस्मिता बहिरट, डॉ. अनुरिता सकट उपस्थित होते. आयोजन अमित सातकर, ललित लांडे, विनायक महाळुंगे, विकी वारगसे, राजकुमार यादव, किरण झा, राज ठाकूर, कुंडलिक जाधव यांनी केले.
----
जिल्हा काँग्रेस कमिटी, कसबा ब्लॉक
तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, खडक पोलीस ठाण्यातील महिला अधिकरी व कर्मचारी आणि अन्नधान्य वितरण विभाग येथील महिलांचा माजी अध्यक्षा कमला व्यवहारे यांच्या हस्ते सन्मान केला. यावेळी सहपोलीस आयुक्त, सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, प्रवीण करपे, नीलम करपे, बबलू कोळी, सुरेश कांबळे, सागर सासवडे, अंजली सोलखपुरे, नलिनी दोरगे, पपिता सोनावणे उपस्थित होते.
----
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन
बीएसएनएल पीजीएम सातारा रस्ता या कार्यालयातील महिलांना चाफ्याचे फुल आणि मास्कचे वाटप करून शुभेच्या दिल्या. यावेळी अर्चना सावरकर, पुष्प फराटे, विद्या भुजबळ, मनीषा मंत्रवादी, मीनल भुजबळ, हेमा कमरकर, मंदा थोपटे, संगीता नागपुरे, गणेश भोज, नितीन कदम, प्रदीप गायकवाड उपस्थित होते.
--
ग्रोव्हर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया व उगम फाऊंडेशन
संयुक्त विद्यमाने पुष्परचना व सजावट कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी संचालक धनंजय कदम, चेतना बिडवे उपस्थित होते. ज्योती सातव यांनी प्रस्तावित केले. अनिता गायकवाड यांनी आभार मानले.
--
शिवनेरी रिक्षा संघटना
महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वरीष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, संघटनेचे आबा बाबर, वर्षा इसवे, प्रमोद शेंडगे, पुनम गायकवाड उपस्थित होते.
--
युगंधर कला-क्रीडा संघ
संघाच्या वतीने ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. यावेळी युगंधर जीवनगैरव पुरस्कार रत्नमाला नाईक यांना प्रदान केला. आमदार मुक्ता टिळक, बापू नाईक, प्रमोद कोंढरे, अश्विनी पांडे, अजय खेडेकर, जतीन पांडे, प्रणव कडेकर उपस्थित होते.
--
तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेस १०० बकेट , १०० मग, १०० कंपास पेटी या वस्तूंचे वितरण केले. यावेळी संचालिका किशोरी सोनी, स्नेहा लढ्ढा, संगीता मुंदडा, नंदा भुतडा, कमला परतानी, भारती पुंगलिया, पदमा काळे उपस्थित होते.