----
न्यायमूर्ती म. गो. रानडे यांची माहिती पाठवण्याचे आवाहन.
पुणे : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे न्यायमूर्ती म.गो. रानडे अध्यासन केंद्र सुरू केले आहे. अध्यासन कार्याचा एक भाग म्हणून त्यांचे जीवन आणि कार्य यावर बहुखंडीत ग्रंथ प्रकाशित करणार आहे. त्यासाठी न्यायमूर्तीसंबंधी माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे. त्यांनी लिहिलेले लेख, पुस्तके, त्यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके, नियतकालिके, पत्रव्यवहार अशा कोणत्याही स्वरूपात असलेली माहिती संस्थेकडे पाठवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
-----
गणेश जयंतीनिमित्त अनाथ आश्रमाला मदत
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही नाना पेठ मंडळाच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त बीड येथील आदिवासी समीकरण पारथी समाज या संस्थेला सुमारे ५०० किलो धान्य दिले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढवळे, नितीन मोहिते, अमित गवळी, रोहित धेंडे, आशिष उमाप, रुपेश पवार उपस्थित होते.
----
गणेश जयंती कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम
पुणे : समाज विकास मंडळाच्या वतीने गणेश जयंतीच्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सत्कार, वाटप, असे सामाजिक उपक्रमही राबवले. आमदार मुक्ता टिळक यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका स्मिता वस्ते, प्रमोद कोंढरे, नितीन पंडित उपस्थित होते. शासकीय नियमांचे पालन करून धार्मिक पूजा विधीसह हळदी-कुंकू आणि तिळगूळ समारंभाचे आयोजन केले होते. तर मंडळाच्या परिसरातील नागरिकांसाठी पाणपोई उभारणे, गरीब आणि गरजूना ब्लॅंकेट वाटप, पुणे महापालिका विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील सफाई सेवकांचा सत्कार असे सामजिक उपक्रम राबवले होते.