पुणे: सुटीच्या दिवशी (दि.२६) अचानक सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. तसेच आज देखील वरूणराजा सायंकाळी हजेरी लावणार आहे. सध्या पुणे शहराजवळ आणि जिह्यात आकाशात ढगांची निर्मिती होत आहे. येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट झाली. हवामान विभागाने तीन-चार दिवसांपूर्वीच राज्यात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज दिला हाेता. आज देखील राज्यामध्ये पुणे, रायगड, ठाणे, नंदूरबार, धुळे, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, पालघर, मुंबई, नगर या भागात येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार विजांच्या गडगडासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्याच्या आसपास आकाशामध्ये मोठ्या ढगांची निर्मिती सध्या सुरू असून, परिणामी येत्या दोन-तीन तासांत पुणे व जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
शहरातील २४ तासांतील पाऊस
खेड : ३४.५नारायणगाव : ३३.०आंबेगाव : ३२.०तळेगाव : २५.०एनडीए : १७.५हडपसर : १६.५ढमढेरे : १६.५राजगुरूनगर : १३.०चिंचवड : १२.०भोर : ११.५लवळे : ८.०हवेली : ६.५पाषाण : ६.५दौंड : ५.५शिवाजीनगर : ५.१वडगावशेरी : ५.०कोरेगाव पार्क : ४.०