पिंपरी : गुरुवारी सकाळपासून उघडीप दिलेल्या पावसाने सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सुरुवात केली आहे. ढगांचा गडगडात वरुण राजाचे आगमन झाले आहे. जोरदार पावसात सुरुवात झाल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे गणेश भक्तांनी घरगुती गणरायाला निरोप दिला. सायंकाळी पावणेचार वाजता दहा मिनिटं पाऊस बरसला. त्यानंतर काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा सव्वाचारला पावसाला सुरुवात झालेली आहे.
ढगांचा गडगडात आणि विजांच्या लखलखाट होत आहे. तर मिरवणुकीची तयारी करत असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. चिंचवडच्या मिरवणुकीची सुरुवात अजूनही झालेली नाही.