वरवंड
वरवंड : वरवंड येथे हॉटेल व दुकाने चालू ठेवून नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी दौंड तालुक्याच्या तहसीलदारांनी स्थानिक प्रशासनाला हॉटेल सिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वरवंड येथील हॉटल महाराजा सील करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन केले तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्यात आले. मात्र काही दुकाने व हॉटेल यांच्याकडून नियमांची पायमल्ली सर्रासपणे सुरु होती. ब्रेक द चेन अंतर्गत केवळ हॉटेल सुरु ठेवून केवळ पार्सल देण्याची परवानगी आहे. मात्र काही हॉटलचालकांनी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसण्याची सेवा उपलब्ध केली, त्यामुळे हॉटेलमध्ये गर्दी होत होती. त्यामुळे हॉटेल सील करण्याचा आदेश देण्यात आला.
ही कामगिरी तलाठी जाधव, ग्रामसेवक एस. बी. डोळस, पोलीस नाईक दशरथ नाईक, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस शिपाई हनुमंत कटके, पोलीस शिपाई जे. एम. मुटेकर, उपसरपंच प्रदीप दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, मारुती फरगडे, कांता टेंगले यांनी केली
--
फोटो क्रमंक : १९ वरवंड हाॅटेल सील
फोटो ओळ-तहसीलदार यांच्या आदेशानुसार हॉटेल सील करताना स्थानिक। प्रशासन