गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शासनाने सर्व सणांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचा विळखा कमी झाला असून आज वटपौर्णिमा महिलांनी सोशल डिस्टन्स पाळूूून साजरी केली.
मागील वर्षीही कोरोनाच्या काळात महिलांनी साधेपणाने वटपौर्णिमा साजरी केली होती. त्याचप्रमाणे आजही कोरोनाचे सावट असल्याने महिलावर्गाने सगळी सुरक्षितता बाळगून साधेपणाने वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा सणानिमित्त काही महिलांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले. काही महिलांनी बाहेर येऊन वटपौर्णिमा साजरी केली, तर काही महिलांनी घरीच छोट्या कुंडीतील वटवृक्ष आणून त्या वटवृक्षाची पूजा केली. भारतीय संस्कृतीचे व सणांचे सर्व जगभरात कौतुक होत असते यामागे विज्ञान देखील आहे. निसर्गाच्या गती चक्रावर हे सण आपण साजरे करत असतो.
--
२४थेऊर वटपोर्णिमा
फोटोओळी : वटवृक्षाला फेरे मारताना स्त्रिया.
===Photopath===
240621\24pun_7_24062021_6.jpg
===Caption===
२४थेऊर वटपोर्णिमाफोटोओळी : वटवृक्षाला फेरे मारताना स्त्रिया