पुणो : वेदविद्येचे वेबपोर्टल तयार करण्याचे प्रय} केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक कला केंद्रातर्फे सुरू झाले असून ¬ग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद या वेदांमध्ये कोणते ज्ञान नमूद आहे, याची माहिती कोणालाही या पोर्टलमुळे शक्य होईल.
वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वरभट्ट घैसास, विश्वस्त, माजी खासदार अण्णा जोशी, वेदभवन रौप्यमहोत्सव कार्याध्यक्ष मुकुंद चितळे यांनी वेदभवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती सांगण्यात आली. या पोर्टलच्या संदर्भात चार तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये घैसास यांचा समावेश आहे. रामकिशोर शाी, जुगलकिशोर मिश्र, प्रकाश पाण्डेय, के. सुदर्शन शर्मा यांचा त्यात समावेश आहे.
वेदपाठ शाळेतर्फे गेल्या 7क् वर्षामध्ये गुरुकुल पद्धतीने 7क्क्/8क्क् विद्याथ्र्यानी अध्ययन केले. त्यांच्यापैकी अनेक जण परदेशांत पौरोहित्य व तत्सम धार्मिक कार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)
परदेशातही कुतूहल
4 घैसास म्हणाले, ‘‘वेद म्हणजे ज्ञान. ते कोणालाही उपलब्ध आहे. महाराष्ट्रात 6क् वेदपाठशाळा असून सुमारे दीड हजार विद्यार्थी आहेत. भारतात वेदांविषयीची जिज्ञासा कमी झाली आहे आणि परदेशांत त्याविषयीचे कुतूहल वाढले, ही वस्तुस्थिती आहे. वेदविद्येविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रय} आम्ही चर्चासत्रंच्या माध्यमातून करीत असतो. चारही वेदांविषयी सर्वागीण माहिती, त्यांच्या उच्चरणांचे शा आदी बाबी वेबपोर्टलमध्ये असतील.