नीरा :
नीरा खोऱ्यातील नीरा देवधर, भाटघर, गुंजवणी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या धरणांतून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन वीर धरणातून नीरा नदीत १४ हजर ४०८ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
वीर धरण सोमवारी सायंकाळी ५ वाजता ९६.४० टक्के भरले होते. योग्य पाणीपातळी ठेवून नीरा नदीत पाणी सोडले जात आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत चार धरणातील एकत्रित पाणीसाठा पाहिला तर गतवर्षी पेक्षा आजचे दिवशी सुमारे ३३ टक्के जादा पाण्याची आवक झाली आहे. नीरा उजवा कालव्यावरील सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुके आणि डाव्या कालव्यावरील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरण पातळी (मिटरमध्ये) पाणीसाठा (दलघफू) टक्के विसर्ग (क्युसेक) पाऊस
भाटघर ६१५.३२ १४ हजार ९५५ ६३.६३ ०० १० मीमी.
निरा-देवघर ६६४.७० १० हजार ५३९ ८९.९५ ७५० १९ मीमी.
वीर ५७९.५४ ९हजार ७० ९६.४० १४ हजार ४०८ ०.४ मीमी
गुंजवणी: ७२५.१० ३ हजार २३८ ८७.७७ २०० ३४ मीमी
फोटो :
नीरा : वीर धरणातून साेडण्यात येणारा विसर्ग