सिद्धी जोहरच्या तावडीतून आपल्या राजाला सुखरूप सोडविण्यासाठी जिवाची बाजी लावणारे व सात तोफांचा आवाज कानी येईपर्यंत खिंड लढविणारे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांची जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली.
बाजीप्रभूच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्यहार अर्पण करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, सरपंच शंकर माने , ग्रामपंचायत कर्मचारी महंमद शेख, धोंडिबा खुटवड, संग्राम राजेशिर्के, बाळू सोनवणे, बबनराव खाटपे, दत्तात्रय कंक, विजय भालेघरे, तानाजी कुंभार, योगेश खुटवड, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या वतीने उपस्थित ग्रामस्थांना घरीच रहा सुरक्षित रहा , हात स्वच्छ धुवा, विनाकारण परगावी फिरू नका, गरज असेल तरच तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडा, अशी विनंती करण्यात आली.