शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुण्याच्या मार्केटयार्डमधील भाजीपाला व फळे विभाग २१ व २५ ऑगस्टला सुरूच राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 1:42 PM

आडते असोसिएशन भूमिकेला पाठिंबा पण बंदमध्ये सहभागी नाही: विलास भुजबळ

ठळक मुद्देनाशवंत शेतमालाचा व्यापार असणाऱ्या आडत्यांचा व्यापार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे विस्कळीत

पुणे : बाजार आवारातील व्यापार देखील नियमन मुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य,बाजारसमिती संघाने शुक्रवारी (दि.२१) व पुणे मर्चंट चेंबरच्या माध्यमातून अन्न धान्य व गुळ भुसारच्या राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५ ) शेतमालाच्या सर्व बाजार पेठा नियमन मुक्तीच्या विरोधामध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरील दोन्ही संस्थांनी बाजार बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयास श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचा संपूर्णपणे पाठिंबा आहे.परंतु, नाशवंत शेतमालाचा व्यापार असणाऱ्या आम्हा आडत्यांचा व्यापार सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे.एक दिवस सुद्धा बाजार बंद ठेवल्यास नाशवंत मालाचा संपूर्ण व्यापार हा पूर्णपणे विस्कळीत होतो.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळे विभाग २१ व २५ ऑगस्टला सुरूच राहणार असल्याचे आडते असोसिएशन अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. याबाबत असोसिएशने काढलेल्या पत्रकात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने वरील वस्तूंचा व्यापार करणाऱ्या सर्व शेतमालाच्या व्यापारावरील नियमन मुक्तीचा निर्णय घेवून त्या प्रमाणे आदेश काढलेला आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे.त्यानुसार आडते असोसिएशनच्या वतीने २० जानेवारी २०१९ रोजी पूर्वीच्या युती सरकारकडे ज्या प्रमाणे बाजार आवारा बाहेर नियमन मुक्ती केलेली आहे.त्याच प्रमाणे मुख्य बाजार आवारात देखील नियमन मुक्ती करण्याची मागणी केलेली आहे. त्याच प्रमाणे १० फेब्रुवारी २०२० रोजी सध्याच्या आघाडी सरकारकडे सुद्धा लेखी पत्राद्वारे बाजार आवारा मध्ये सुद्धा नियमन मुक्ती करावी अशी मागणी केलेली आहे.सध्या शासनाने काही दिवसांपूर्वी अन्न धान्य व भुसार या शेतमालाची सुद्धा नुकतीच बाजार आवारा बाहेर नियमन मुक्ती केल्याचे आदेशानुसार जाहीर केलेले आहे.त्याच प्रमाणे मुख्य बाजार आवारा मध्ये सुद्धा नियमन मुक्ती करावी. सदर मागणीचा पाठपुरावा आडते असोसिएशनच्या माध्यमातून आपण शासन दरबारी सातत्याने करत आहोत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.त्यामुळेच गुलटेकडी मार्केट यार्डातीलफळे,भाजीपाला,कांदा-बटाटा,केळी व पानाचा व्यापार हा पूर्णपणे सुरू राहील असे विलास भुजबळ यांनी स्पष्ट केले

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्याfruitsफळेFarmerशेतकरी