शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पालेभाज्यांची आवक घटली

By admin | Published: July 17, 2017 3:50 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. लसूण, भुईमूग शेंग

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. लसूण, भुईमूग शेंग यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. कांदा व भुईमूग शेंग, लसूण भाव स्थिर राहिले, तर बटाट्याचे भाव उतरले. कांदावगळता बटाट्याची आवकही घटली. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात मेथी वगळता इतर पालेभाज्यांची आवक घटली. याही सप्ताहात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथीची, पालक यांची आवक घटली. जनावरांच्या बाजारात गाई वगळता, म्हशी, बैल शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. जनावरांच्या बाजारात एकूण २ कोटी ३० लाख रूपयांची उलाढाल झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३८५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९० क्विंटलने वाढली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १८०५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४९५ क्विंटलने घसरली व कमाल भाव ८०० रुपयांवरून १०० रुपयाने कमी होऊन ७०० रुपये झाले. जळगाव भूईमूग शेंगाची एकूण आवक ६५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही अवक स्थिर राहिली. शेंगांचा कमाल भावही ५ हजार रुपयांवर स्थिर राहिला. या सप्तहातही बंदूक भुईमूग शेंगांची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ६ क्विंटलवर स्थिर राहिली. कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिर झाले. हिरव्या मिरचीची एकूण आवक २९९ क्विंटल झाली, तर भावात घट झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ४५०० रुपये, असा कमाल भाव मिळाला.