शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

मार्केट यार्डात भाजीपाल्याची वर्षातील विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:40 AM

मागणी वाढ : भाजीपाल्यांचे दरही १० ते २० टक्क्यांनी वधारले

पुणे : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येवर गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात भाजीपाल्याची यंदाच्या वर्षातील विक्रमी आवक झाली. आवक वाढली, तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणात असल्याने भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, सिमला मिरची, वालवर, भुईमूग शेंग, मटार आणि पावटा या भाज्यांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली, तर अन्य सर्व फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

दर वर्षी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सर्वच भाज्यांना चांगले दर मिळतात. यामुळे शेतकरी भोगीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणतात. यंदा भोगी सोमवारी असल्याने रविवार (दि.१३) रोजी तब्बल २५० ट्रक शेतीमालाची तरकारी विभागात आवक झाली. आवक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजार समितीने देखील शनिवार (दि.१२) रोजी रात्री ९ वाजल्यापासूनच शेतकरी आणि आडत्यांना माल विकण्यास परवानगी दिली होती. मालाची आवक वाढून देखील शेतकऱ्यांना नेहमीच्या तुलनेत चांगला दर मिळाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.बाजारात प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १७ ते १८ ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून ३० ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले १२०० ते १३०० पोती, टोमॅटो साडेतीन ते चार हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ९ टेम्पो, गवार ३ ते ४, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमूग २०० ते २५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो , कांदा १२० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.हरभरा महागला; अन्य सर्वच पालेभाज्या तेजीत

  • मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे मेथी वगळता पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम आहेत. विशेषत: हरभरा गड्डीच्या दरामध्ये तर शेकडा जुडीमागे तब्बल ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने कोथिंबिरीच्या दरामध्ये काही प्रमाणात घट झाली.
  • तरीही कोथिंबिरीचे भाव नेहमीच्या तुलनेत जास्त आहेत. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ८ ते १४ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपये दराने जुडीची विक्री होत आहे. केवळ मेथीच्या दरामध्ये मात्र जुडीमागे २ रुपयांनी घसरण झाली असून, घाऊक बाजारात जुडीला ३ ते ५ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ८ ते १० रुपये दराने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
  • रविवारी येथील बाजारात कोथिंबिरीची तब्बल अडीच लाख जुडी आवक झाली. तर, मेथीची १ लाख जुडी आवक झाली आहे.
टॅग्स :vegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्ड