शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

भाजीपाला विभागातील १८ आडते बाजार समितीच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:53 AM

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील डाळिंब विभागात जानेवारी २०१९ मध्ये डाळिंब घोटाळा उघडकीस

ठळक मुद्दे१८ आडत्यांना तब्बल ४ कोटी ५३ लाख ८९ हजार ९२८ रुपये भरण्याचे बाजार समितीचे आदेशफळे, भाजीपाला विभागातील एकूण ७२ आडत्यांपैकी आजपर्यंत ३५ आडत्यांची तपासणी पूर्ण

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सेस बुडविणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या डाळिंब व्यापाऱ्यांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. त्यात आता नव्याने भाजीपाला विभागातील १८ आडते बाजार समितीच्या रडारवर आले आहेत. यामध्ये या १८ आडत्यांना तब्बल ४ कोटी ५३ लाख ८९ हजार ९२८ रुपये भरण्याचे आदेश बाजार समितीने दिले आहेत.  फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील या आडत्यांनी बाजार समितीचा सेस बुडविण्यासह शेतकरी व खरेदीदारांच्या शेतमाल पट्टीत हमाली, भराई/विगतवारी, तोलाई, लेव्हीच्या माध्यमातून अतिरिक्त पैसे वसूल करत लूट केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील डाळिंब विभागात जानेवारी २०१९ मध्ये डाळिंब घोटाळा उघडकीस आणला होता. त्या चार डाळिंब आडत्यांना आठ दिवसांपूर्वी चार डाळिंब आडत्यांना दीडपट दंडासह तब्बल ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपये भरण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. बाजार समितीने डाळिंब घोटाळ्यानंतर संशयित आडत्यांची दफ्तर तपासणीचे काम हाती घेतले. फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील ताब्यात घेतलेल्या एकूण ७२ आडत्यांपैकी आजपर्यंत ३५ आडत्यांची दफ्तर तपासणी पूर्ण झाली आहे. त्यात १८ दोषी आढळलेल्या आडत्यांची नावे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. यावेळी समितीचे उपसचिव सतीश कोंडे, सहायक सचिव दीपक शिंदे आदी उपस्थित होते.देशमुख म्हणाले, की १८ पैकी १४ आडत्यांना बेकायदा वसूल केलेल्या रकमांबाबत कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. यावर खुलासा करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तर, अंतिम नोटीस दिलेल्या चार आडत्यांकडून आत्तापर्यंत ४ लाख ९८ हजार ६२० रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. तर, दफ्तर तपासणीत एका आडत्याकडून कोणतेही येणी बाकी नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्या आडतदार फर्मचे नाव मे.शंकर दिनकर पोमण असे आहे. उर्वरित ३७ आडत्यांच्या दफ्तर तपासणीचे काम सुरू आहे. येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत ७२ आडत्यांच्या दफ्तर तपासणी व त्यापुढील कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.--अंतिम नोटीस दिलेले चार आडते आणि दीडपट दंडासह वसुलीची रक्कम- पंडित पर्वतराव पवार ३ लाख ७ हजार ३९७- मे.कोरपे आणि कंपनी ४१५ रुपये- मे.शिवशंकर ट्रेडर्स ६ हजार ३४३- मे.जवळकर आणि कंपनी २४ लाख १३ हजार ३०५- एकूण : २७ लाख २७ हजार ४६०

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfruitsफळेvegetableभाज्याbusinessव्यवसायfraudधोकेबाजी