भाजी खरेदीसाठी गर्दी : सोशल डिस्टंसिंगचा फज्जा.
नीरा :
जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार बंदचे दिलेले आदेश धुडकवत पुरंदर व बारामतीच्या शिवेवरआठवडे बाजार भरला . दिवसभर मोरगाव कॉर्नर बुवासाहेब मंदिर येथील नीरा व निंबुत हद्दीत मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली व परिसरातील लोकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी करत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला.
सायंकाळी सहा वाजता पोलीस गाडी आल्यावर ही बाजरकरु बिनदिक्कतपणे बाजार करत होते.
नीरा येथील आठवडे बाजार हा दर बुधवारी असतो. नुक्तेच जिल्हा प्रशासनाने आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नीरेचा आठवडे बाजार प्रभाग २ मधिल बाजरतळावर भरतो. मात्र या ठिकाणी नीरा पोलिसांनी सकाळपासून कडक सुचना देत नियमित व्यावसायकांना बसु दिले. मात्रा आठवडे बाजार करणारे व्यावसायीकांना पिटाळल्याने त्यांनी आपला वेगळा बाजार भरवत पुरंदर बारामती सिमे लगत बुवासाहेब मंदिरा शेजारील सातारा, मोरगाव, बारामती कॉर्नरवर रसत्याच्या कडेला आपली दुकाने थाटली.
मोरगाव कॉर्नर हे बारामती व परंदर तालुक्याच्या सिमेवरील भाग आहे. रसत्याच्या पुर्वेला बारामती तर पश्चिमेला पुरंदर तालुका लागतो. रसत्याच्या दुतर्फा भाजी व भळ विक्रेते, बेकरी, सुकट बोंबील विक्री करणाऱ्यांनी दिवसभर दुकाने थाटली. त्यांना प्रत्यक्ष विचारणा केली असत या विक्रेत्यांना दोन्ही बाजुच्या ग्रामपंचायती किंवा पोलीस प्रशासनाने साधे हटकले ही नाही. रसत्याच्या काठावर धोकेदायक पद्धतीने हे व्यावसायीक जिव मुठीत घेऊन व्यावसाय करत होते.
संध्याकाळी सहा नंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची पोलीस गाडी या ठिकाणी आली. पोलीस गाडी आल्यावरही व्यावसायकांनी दुकाने आवरण्याची तसदी घेतली नाही. काही वेळाने पोलीसांनी हात जोडून विनंती केल्यावर बारामतीच्या हद्दितील व्यापाऱ्यांनी दुकाने आवरली. पण पुरंदरच्या हद्दितील व्यापारी रात्री सात वाजेपर्यंत भाजिपाला विक्री सुरु होतो.
नीरेचा आठवडे बाजार नीरेच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग २ मधे भरतो. आज नीरेच्या शिवेवर बाजार भरला असतान बाजतळावर मात्र शुकशुकाट होता. नीरा पोलीस दिवसभर बाजारतळ परिसरात गस्त घालत असताना मोरगाव कॉर्नवर मात्र दुर्लक्ष झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
नीरेच्या मोरगाव कॉर्नरवर सायंकाळी सहा वाजता पोलीस गाडी आल्यावर ही बाजरकरु बिनदिक्कतपणे बाजार करत होते.