कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी स्कूल बसमधील वाहतूकही बंद झाली. त्यामुळे स्कूल बसचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्कूल बसमधून इतर कोणतीही वाहतूक करण्यास परवानगी नसल्याने सर्व स्कूलबस एका जागेवर उभ्या आहेत. परंतु, काही स्कूलबस चालकांनी उदरनिर्वाहासाठी स्कूलबस मधून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
---------------
शासनाने रिक्षाचालक व शेतकऱ्यांकडे लक्ष दिले. मात्र, स्कूल बसचालकांकडे दुर्लक्ष केले. सध्या शाळांना शुल्क मिळत आहे. विद्यार्थ्यांचेसुद्धा ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु,स्कूल बसचालकांची कोंडी झाली आहे. शासनाने स्कूलबसचालकांना टुरिस्ट वाहतूक करण्याची परवानगी द्यावी व दोन वर्षांचा टॅक्स माफ करावा.
- संदीप कामठे, स्कूलबसचालक
-------
स्कूल बस बंद असल्याने सध्या उपजिविकेसाठी भाजी-पाल विक्रीचा व्यवसाय करत आहे.केव्हा शाळा सुरू होतील आणि आमचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होईल,असे वाटत आहे.
- रवी नांगरे, स्कूल बस चालक
---------------
गेल्या दोन वर्षांपासून शाळा सुरू झाल्या नाहीत. कोरोनामुळे स्कूल बस मालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आरटीओच्या नियमावलीमुळे आम्हाला दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही.मी सध्या मित्राची रिक्षा चालवत आहे.बॅंकेचे हप्ते देण्यासाठी मला सोन्याची अंगठी मोडावी लागली.
- प्रवीण औसेकर, स्कूल बस मालक,
----
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा : ३६५२,
माध्यमिक शाळा : १९३२
पुणे शहरातील स्कूल बस : १,२००
पिंपरी शहरातील स्कूल बस: ८००
--------
भाजीपाला विक्रीची वेळ
शाळा बंद असल्यामुळे अनेक स्कूलबस चालकांना उपजीविकेसाठी स्कूल बस मधून रस्त्यावर भाजीपाला व फळे विकण्याची वेळ आली आहे.
-----