शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

‘अ’ दर्जाच्या पुणे रेल्वे स्टेशनवर वाहन पार्किंगचा उडालाय बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 3:31 AM

अपुऱ्या व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अत्याधुनिक सुविधांची गरज

पुणे : पुण्याहून मुंबई, दौंड किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने रेल्वेने दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, अपुºया पार्किंग व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागेचा तुटवडा नाही. केवळ योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने रेल्वे पार्किंगचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे अत्याधुनिक पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून प्रवाशांच्या पार्किंगचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.पुणे रेल्वे स्टेशन वर्ल्ड क्लास दर्जाचे करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस असून सध्या रेल्वे स्टेशन ‘ए’ दर्जाचे आहे. रेल्वे जंक्शन असल्यामुळे देशाच्या विविध भागातील रेल्वे गाड्या पुणे स्टेशनवर येवून थांबतात. त्यातच दिवसेंदिवस पुणे रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही लक्षणिय आहे. त्यातच विद्येचे माहेरघर सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात शिक्षणासाठी आणि पर्यटनासाठीही अनेक भागातून नागरिक येतात. तसेच राहण्याबाबत सर्वाधिक चांगले शहर म्हणूनही पुणे अव्वल क्रमांकावर आहे, या सर्व बाबींचा विचार करता रेल्वे स्टेशनवरही अत्याधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे. प्रगती एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आदी गाड्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबई, सातारा, बारामती आदी ठिकाणी नोकरीसाठी जाणारे प्रवासी तसेच लोणावळा लोकलने पुणे ते लोणावळा दरम्यान खासगी व सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांना दुचाकी व चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी सहजासहजी जागा मिळत नाही. महात्मा गांधी पुतळ्याजवळील पार्किंगची जागा अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहन लावण्यात अडचणी येतात. तसेच पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढण्यासाठी २० ते ३० मिनिटे जातात. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या जागेत परिसरातील हॉटेलचालक किंवा इतर व्यक्ती दिवसभर गाड्या लावून निघून जातात. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाºया नियमित पासधारकांसह कधीतरी प्रवास करणाºया प्रवाशांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शिवाजीनगर रेल्वे स्टेशनची जागाही अपुरीशिवाजीनगर बस थांब्यावरील वाहनतळावरच शिवाजीनगर रेल्वे स्टेशनहून प्रवास करणारे प्रवासी आपल्या दुचाकी लावतात. एसटीने आणि रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी यांना येथील पार्किंग अपुरे पडते. त्यातच येथून मेट्रो जाणार असल्याने प्रवाशांना पार्किंगला जागाच उरली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मुख्य इमारतीसमोरील पार्किंग बरोबरच, डीआरएम कार्यालयाच्या जवळ दुसºया प्रवेशद्वाराजवळ वर्षभरापूर्वी पार्किंगची व्यवस्था केली असून त्यास सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे रेल्वे स्टेशन बसस्थानक आणि रेल्वे रुग्णालयाच्यामध्ये पार्किंगसाठी जागा केलेली आहे. सध्या तरी अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था किंवा केवळ पार्किंगसाठी इमारत बांधण्याचा कोणाही प्रस्ताव नाही.- मनोज झंवर, जनसंपर्कअधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभागपार्किंग व्यवस्थेची माहिती करून द्यावीरेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील जागेतील पार्किंग आता कमी पडू लागले आहे. याचा विचार करूनच रेल्वे प्रशासनाने बसस्थानक व रेल्वे रुग्णालयाच्या मध्यभागी, पोर्टर चाळ पाडून त्या जागेवर तसेच सहा नंबर प्लॅट फॉर्मच्या बाजूला वाहनतळ आहे. परंतु, याबाबत प्रवाशांना माहितीच नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलक लावून किंवा डिजिटल बोर्डवरून माहिती प्रसारित करून पार्किंग व्यवस्थेची माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे काही प्रमाणात पार्किंगचा प्रश्न सुटू शकेल. - हर्षा शहा,अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुपअडचणींतून काढवी लागते गाडी...रविवारी सकाळी मी रेल्वेने मुंबई येथे जावून सायंकाळी माझे काम करून परत आलो. माझी दुचाकीची जागा बदलेली होती. तसेच दुचाकी अनेक गाड्यांमध्ये लावली होती. सायंकाळी परत आल्यावर अडचणीमधून मला गाडी काढत बसावे लागले. त्यात माझे १५ ते २० मिनिट गेले.- विजयकुमार सिंग, प्रवासीनियोजनाने सुटेल प्रश्न... नगर रस्ता, येरवडा, कोरेगाव पार्क, मुंढवा आदी भागात राहणाºया प्रवाशांनी सहा नंबर प्लॅटफॉर्मकडील प्रवेशद्वाराजवळील वाहनतळावर गाडी लावणे अपेक्षित आहे. परंतु, या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी आरटीओपर्यंत वळसा घालून यावे लागते. त्यातच अलंकार टॉकीज जवळचा पुल सुमारे वर्षभरापासून बंद केला आहे. त्यामुळेही प्रवाशांना अनेक अडचणी येतात. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासन आणि वाहतुक पोलिसांनी नियोजन करून पर्याय उपलब्ध करून दिल्यास रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी कमी होऊ शकेल.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेParkingपार्किंग