शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

By admin | Published: December 31, 2014 12:09 AM

मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले.

पुणे : ‘मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. याशिवाय २७ वाहने त्यांनी भंगारात निकामी केल्याचे तपासात समजले आहे.काशिनाथ हरिभाऊ टकले (३२ माळशिरस, सोलापूर) आणि विनायक ऊर्फ चिकू कृष्णराव वाघमोडे (२५, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. भंगारात निकामी केलेल्या वाहनांमध्ये १२ चारचाकी आणि १५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी चोऱ्या केल्या. १९९७ पासून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.टकले याचा माळशिरसमध्ये वेल्डिंगचा व्यवसाय आहे. त्याच्या दुकानासमोर बऱ्याच चारचाकी व दुचाकी वाहने उभी असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. माहितीचा पडताळा करण्यासाठी ते सोलापूरमध्ये गेले असताना टकले स्वस्तात ग्रामीण भागात वाहने विकत असल्याचे दिसून आले. ही वाहने जुनी झालेली असून ज्यांनी ही वाहने विकत घेतली, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी खास पथक स्थापन केले आहे. त्यातील शिपाई विनोद शिवले यांना टकले याच्या चोऱ्यांची माहिती समजली होती. खात्री होताच टकले यास ताब्यात घेण्यात आले. ‘मास्टर की’च्या साहाय्याने स्वारगेट, डेक्कन, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क, कोथरूड, कोंढवा, वानवडी, दत्तवाडी, सिंंहगड रस्ता, जेजुरी अशा भागातून वाहने चोरली होती. नंबर प्लेट बदलून ती माळशिरसला नेल्यानंतर विकली जात असत. आरोपी सराईत चोरटे असून, नगरमध्ये त्यांच्यावर २५हून अधिक गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी आज पत्रकार परिषदेत गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सांगितली. सहायक आयुक्त जगदीश लोहळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंंद गायकवाड उपस्थित होते. तपास पथकातील फौजदार गिरीश सोनवणे, सुनील सोळुंके, कर्मचारी यशवंत आेंबासे, सचिन उगले, प्रणव संपकाळ, विनोद शिवले, कुलदीप पवार, विनायक शिंंदे, अमोल भोसले, संदीप पाटील, सागर केकाण, मयूर दळवी यांना या कामाबद्दल बक्षीस देणार असल्याचे तांबडे यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)