पुणे : लॉकडाऊनच्या काळात जवळपास ३ महिने संचारबंदी असल्याने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या प्रकारात २०१९ च्या तुलनेत घट दिसत असताना दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यात मात्र मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यातील गुन्ह्यांचे प्रमाण पाहता वाहनचोरी, घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे लॉकडाऊनपूर्वीच्या पातळीवर जाऊन पोहचले आहेत.
२०१९ मध्ये ७४ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा ७३ खुनाचे प्रकार घडले आहेत. इतर जबरी चोरीही वाढलेल्या दिसून येत आहेत.खुनाचा प्रयत्न केल्याचे २० गुन्हे डिसेंबर महिन्यात दाखल झाले आहेत. गंभीर दुखापत, रस्त्यावरील मारामारीच्या गुन्ह्यात गंभीर कलमे लावण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे २० गुन्हे दाखल आहेत.
लॉकडाऊनच्या काळात इतर गुन्हे कमी झाले तरी कौटुंबिक हिंसाचार वाढले असे सांगितले जात होते़ त्याचे प्रत्यंतर महिलांना क्रुर वागणूक देणे या गुन्ह्याच्या प्रकारात दिसून येते़ २०१९ मध्ये २७२ गुन्ह्यांची नोंद होती़ लॉकडाऊनमध्ये ३ महिने लोकांना बाहेर पडण्याची सोय नव्हती़ असे असले तरी २०२० मध्ये २६२ गुन्हे दाखल झाले आहे़ असा प्रकार दुखापतीच्या गुन्ह्यात दिसून येत आहे.लॉकडाऊन नंतर इतर क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ कमी अधिक प्रमाणात असले तरी गुन्हेगारीच्या क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ लवकर आले असल्याचे दिसून येत आहे.़़़़़़़़़़़़गुन्ह्याचा प्रकार डिसेंबर २० अखेर डिसेंबर १९ अखेरखुन ७३ ७४खुनाचा प्रयत्न १०८ १२१दरोडा ५ २०दरोडा तयारी २८ १४चैन स्रचिंग ४८ ६४मोबाईल स्रचिंग ४६ ७५इतर जबरी चोरी ७६ ८२घरफोडी ३४० ४६०गर्दी -मारामारी १५३ १५५दुखापत ९३८ ९८५विवाहितेला क्रुर ९३८ ८९५वागणूक देणेबलात्कार १६० २२४विनयभंग २६६ ४१९ अपहरण ४५८ ४४७फसवणूक ४८५ ९२६चोरी ५९० १३६७वाहनचोरी ९६७ १६७८फेटल १३९ २२०एनडीपीएस ११८ ११९जुगारप्रतिबंधक २४३ ४६१दारुबंदी कायदा १२४० १११९