शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, तर अनेक विहिरींचे पाणी आटल्याने सपकाळवस्ती ग्रामस्त आक्रमक झाले आहे. रविवारी काम बंद पाडल्यावर सोमवारी पुन्हा प्रकल्पाची वाहने आल्याने ग्रामस्थांनी ती रस्त्यातच अडवून पुन्हा काम बंद पाडले.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी वरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर (ता.इंदापुर) येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सपकळवाडीत गावात अनेकांच्या घरांना तडे गेले. तर या परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी जात काम बंद पाडले होते. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, सोमवारी सकाळी मुरुमाने भरलेले ट्रक हे प्रकल्पाच्या ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येत वाहनांच्या पुढे येत ती अडवली. वाहने पुढे नेऊ नका असे म्हणत ग्रामस्थ ट्रक पुढे झोपण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या हादऱ्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून नुकसान होत आहे. बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून हे आंदोलन सुरू आहे. या विषयी रविवारी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.

कोट

रविवारी ग्रामस्थांच्या आंदोलनांनतर ठेकेदारांनी प्रकल्पाचे किंवा तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान होणार नाही ती कामे सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. बोगद्यातील पाणी काढणे गरजेचे असल्याने ते काम सुरू ठेवावे. मात्र, बोगद्यातील काढलेला मुरूम तसाच ठेवावा, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांही साेमवारी सकाळी मुरुमाने भरलेली वाहने मुरूम यार्डा कडे जात होती. ठेकदेदाराने फसवणूक केल्यामुळे ग्रामस्थांनी अडविली. अधिकाऱ्यांनी आमचा संयम तुटू देऊ नये. अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल.

-सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी

फोटो ओळ : नदीजोड प्रकल्पाची मुरुमाने भरलेली वाहने अडवतांना सपकळवाडी येथील शेतकरी.