शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Video - नो पार्किंगमधील वाहने '' हायड्रोलिक क्रेन '' उचलणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 8:53 PM

शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील २२ वाहतूक विभागात आणली जातात़

ठळक मुद्देनियम मोडणाऱ्या बसणार मोठा भुर्दंड : दुचाकी ४३६ रु़ चारचाकी ६७२ रुपये़नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक या कंपनीची निविदा मंजूर

पुणे : वाढती वाहन संख्या, अपुरी पार्किंगची व्यवस्था यामुळे अनेकदा नाईलाजाने अथवा चुकून नो पार्किंगमध्ये वाहने लावतात़. तेव्हा वाहतुक शाखेचे टेम्पो ही वाहने उचलून नेतात़. त्यावरुन अनेक तक्रारी होत असतात़. या तक्रारीचे निराकरण व्हावे व वाहनांचे नुकसान होऊ नये, म्हणून आता वाहतूक शाखेच्या वतीने यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहे़. मात्र, या पद्धतीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोठा भुर्दंड बसणार आहे़. 

शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील २२ वाहतूक विभागात आणली जातात़ तेथे वाहनचालकांकडून दंड व टेम्पोचा टोईंग खर्च वसुल केला जातो़. ही वाहने टेम्पोतील कर्मचारी एखाद्या टोळधाडीसारखी येऊन वाहन उचलतात़. वाहन उचलताना तशी कशीही उचलली जाते़. त्यातून अनेकदा वाहनांचे नुकसान होते़. यावरुन अनेकदा वादावादी होत असतात़. हा प्रकार टाळण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहेत़. त्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने ई निविदा काढली होती़ नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक या  कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे़. याबाबतचा करार लवकरच करण्यात येणार आहे़. त्यानंतर प्रत्यक्षात हायड्रोलिक पद्धतीने वाहने उचलणे सुरु होणार आहे़. वाहतूक शाखेत मंगळवारी या यांत्रिक पद्धतीने वाहन उचलण्याचे प्रात्याक्षिक वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख व अन्य अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले़. याबाबत विदर्भ इन्फोटेकचे सहायक प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत गंगाथडे यांनी सांगितले की, आमची अशाच पद्धतीने वाहने उचलणारी ८० वाहने सध्या मुंबईत कार्यरत आहेत़. पुणे शहरात दुचाकी वाहने उचलण्यासाठी ३५ क्रेन आणि चारचाकींसाठी १० क्रेन आणण्यात येणार आहे़. या क्रेनवर चालक व दोन कर्मचारी असणार आहेत़. वाहतूक शाखेचा कर्मचारी सांगेल, त्या वाहनाला हे कर्मचारी हँडेल व मागील बाजूला पट्टा बांधतील व तो पट्टा हायड्रोलिक क्रेनच्या हुकाला लावून वाहन उचलले जाऊन क्रेनमध्ये ठेवण्यात येईल़. यामध्ये माणसांनी वाहन उचलताना, ते टेम्पोत चढविताना होणारे नुकसान टाळले जाणार आहे़. एक क्रेन एकावेळी ७ ते ८ वाहने उचलू शकते़. सध्या वाहतूक शाखेकडे १० टेम्पोद्वारे वाहने उचलली जातात़. शहरातील वाहनांची संख्या व नियम मोडण्याचे प्रमाण पाहता ते खूप कमी आहे़. त्यामुळे अनेक वाहतूक विभागांना आठवड्यातून एखादा दिवस टेम्पो मिळतो़. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, मुंबईच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गृह विभागाच्या सूचनेनुसार यांत्रिक पद्धतीने वाहने उचलण्याची निविदा वर्षभरापूर्वी काढण्यात आली होती़. या कंपनीची निविदा मान्य करण्यात आली असून आवश्यक तो करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़. ़़़़़़़़़ सध्या वाहतूक शाखेच्या वतीने टेम्पोद्वारे उचलण्यात येणारा वाहनांना प्रत्येकी ५० रुपये  टोईंग चार्जेस आकारण्यात येतात़. ़़़़़़़़़़़यांत्रिक पद्धतीने उचलेल्या वाहनांवरील दंड (दुचाकीसाठी रुपये)टोर्इंग चार्जेस    २००दंड        २००जीएसटी        ३६़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़एकूण        ४३६ रुपये़़़़़़़़़़़़

चार चाकींसाठी (रुपये)टोर्इंग चार्जेस    ४०० दंड        २००जीएसटी         ७२ ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़एकूण        ६७२ रुपये़़़़़़़़़़़़़या क्रेनची वैशिष्टे* वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता नाही* वादावादीचे प्रसंग टळणार* क्रेनवर दोन्ही बाजूला कॅमेरे बसविण्यात आले असल्याने वाहन उचलण्याचे संपूर्ण चित्रिकरण होणार* कॅमेºयावर चित्रिकरण होणार असल्याने वाहने तशीच सोडून देण्याचे प्रकार थांबण्याची शक्यता़ * कॅशलेस व्यवस्था* मात्र, या पद्धतीने चुकून जरी नो पार्किंगमध्ये वाहन उभे केले गेले तर वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसणार

 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीस