पाटस : टोलनाका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी पाटस ग्रामस्थांनी टोलनाक्यावर येत महामार्ग रोखून धरला. पाटसचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद दोशी, जनसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी देशमुख यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले. टोलनाका प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. वास्तविक पाहता स्थानिक लोकांकडून टोल घेऊ नये, असे असतानादेखील स्थानिक लोकांकडून टोल घेतला जातो; तसेच टोलनाक्याच्या हाकेच्या अंतरावर बारामतीला जाण्यासाठी वेगळा मार्ग निघतो. तरीदेखील बारामतीला जाणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जातो. हा टोल घेऊ नये म्हणून वेळोवेळी ग्रामपंचायतीने, ग्रामस्थांनी टोलनाक्याला कळविलेले आहे. तरीदेखील दादागिरी करून टोल घेतला जातो. या निषेधार्थ टोलनाक्याच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. त्यातच संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी वाहने रोखून धरली. टोलनाक्यातील अधिकारी चर्चेला येत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला. ग्रामस्थांशी चर्चा करायला एकही अधिकारी आला नाही. परिणामी, टोलनाक्याच्या कार्यालयाकडे जाणाºया गेटला कायम कुलूप लावलेले असते. त्यामुळे ग्रामस्थांना अधिकाºयांना भेटायला जाता येत नाही. त्यामुळे अधिकारी सुटीवर आहे, असे चुकीचे निरोप दिले जातात. येथील कामगारांना देखील तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची चर्चा आज टोलनाक्याच्या परिसरात होती............... सोमवारी टोलनाक्यात कचरा टाकणारपाटस गावातील उड्डाण पुलाजवळील स्वच्छता आणि साफसफाई याची देखभाल पाटस टोलनाक्याकडे आहे. साधारणत: एक किमीच्या अंतरावरील या पुलाच्या दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, पुलाजवळील घाण, कचरा रविवार (दि.२) पर्यंत साफ केला नाही, तर सोमवार (दि.३) रोजी ग्रामस्थ सर्व कचरा उचलून हा कचरा टोलनाक्याच्या कार्यालयात आणून टाकणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मिलिंद दोशी, जनसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी देशमुख यांनी टोलनाका प्रशासनाला दिला आहे.
पाटस टोलनाक्यावरील वाहने अडवली : ग्रामस्थांनी केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 7:16 PM
टोलनाका प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे
ठळक मुद्देटोलनाका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा केला निषेध सोमवारी टोलनाक्यात कचरा टाकणार