माहीती वेल्हे पोलीसांनी दिली. महसुल विभाग, भुमिअभिलेख विभाग, आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून संयुक्तिक रित्या अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहीती देताना वेल्हे पोलीस स्टेशनटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले की, वेल्हे येथील गट नं ५० मध्ये १ हेक्टर ४२ गुंठे जमीन ही वेल्हे पोलीस ठाण्याची आहे. नियमानुसार २४ जुलै २०१९ रोजी
येथील जागेची रितसर मोजणी करण्यात आली होती. यावेळी अतिक्रमणात आलेल्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या तर तहसिलदारांकडुन २९ जानेवारी २०२१ रोजी अतिक्रमण हटविण्याच्या नोटीशी देखील चार जणांना देण्यात आल्या
होत्या त्यानुसार आज १२ मार्च रोजी दुपारी दोन पोलीस अधिका-यांसह ३० कर्मचारी व शीघ्रकृतीदलांच्या जवांनासह ही कारवाई करण्यात आली.
गेली २६ वर्षे या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. हॅाटेल स्वप्निल हे वेल्यातील सुप्रसिद्ध हॅाटेल होते.
पुणे शहर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सासवड आदी परिसरातून वेल्ह्यातील हॉटेलवर खवय्ये येत होते.
--
कोट १
पोलिसांच्या वतीने येथील अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत नोटीस दिली होती मात्र त्याला त्यांनी जुमानले नाही त्यामुळे अखेर त्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.
- शिवाजी शिंदे, तहसिलदार वेल्हे.-------
कोट २
सदरच्या जागेसंदर्भात झालेल्या मोजणीबाबत आम्ही अपिलात गेलो आहे दि १५ मार्चला जिल्हा भुमिअभिलेख अधिका-यासमोर सुनावणी
होणार असतानासुध्दा हि कारवाई योग्य रितीने झालेली नाही.
- उत्तम पांगारे ,मालक हॅाटेल स्वप्निल वेल्हे