पुणे : व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’ हे नाटक १९६८ मध्ये रंगभूमीवर आले. याच नाटकाची पुनर्निमिती सुनील बर्वे यांनी त्यांच्या हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वातून केली आहे. सुबक प्रस्तुत या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले असून, नेपथ्य प्रदीप मुळे यांचे आहे. या नाटकाचा लोकनाट्याचा बाज ओळखून त्यास साजेशी संगीतरचना राहुल रानडे यांनी केली आहे. पेशवाईच्या काळात घडलेल्या या काल्पनिक कथेमध्ये मातब्बर सरदार सर्जेराव शिंदे, काठेवाडीतील राजा जोरावर सिंग, जानकी, बकुळी आणि दिवाणजी यांच्यात घडणाऱ्या धम्माल विनोदी कथेची मांडणी, लोकशैली व आधुनिक रंगशैलीचे मिश्रण या नाटकात अतिशय प्रभावीपणे दिसते. या नाटकाच्या पुनर्निमितीतील काही मोजकेच प्रयोग पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झाले. यामध्ये प्रमुख भूमिका निखिल रत्नपारखी, ललित प्रभाकर, अभिजित खांडकेकर, ईशा केसकर व मृण्मयी गोडबोले यांची आहे. या नाटकाचा पुण्यातील शेवटचा प्रयोग शनिवार दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. रसिकांनी हे नाटक पाहण्याची शेवटची दुर्मिळ संधी न दवडता जास्तीत जास्त संख्येने या नाटकास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते व निर्माते सुनील बर्वे यांनी केले आहे.
व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’चा पुण्यातील शेवटचा प्रयोग होणार शनिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:39 AM
व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’ हे नाटक १९६८ मध्ये रंगभूमीवर आले. या नाटकाचा पुण्यातील शेवटचा प्रयोग शनिवार दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
ठळक मुद्देपुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झाले नाटकाच्या पुनर्निमितीतील काही मोजकेच प्रयोग दि. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार पुण्यातील शेवटचा प्रयोग