पुणे : शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, असे सहजपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ओठांवर येणारे बडबडगीत विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक शैक्षणिक साहित्यातून प्राथमिक शिक्षणाला सुरुवात करणारी पाटी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवण्याकडे पालकांचा कल अधिक दिसून येतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही. परिणामी, इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखन (पेन्सिल) ही कालबाह्य संकल्पना वाटते. पाटीचा वापर कमी झाल्यामुळे बाजारात विविध आकर्षक रंगात मण्याच्या माळात अडकलेली पाटी दिसेनाशी होत चालली आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षणात पाट्यांचा वापर काही प्रमाणात दिसून येतो. पूर्वी प्राथमिक शिक्षण हे पाटीशिवाय अपूर्ण असायचे. पाटीवरच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत होता. विद्यार्थीदेखील पाटीसाठी पालकांकडे हट्ट धरत असत. शाळा सुटली पाटी फुटली असे म्हणत, आनंदाने उड्या मारत घरी जाणारे विद्यार्थी आता दिसेनासे होत चालले आहेत. ..........काळानुसार शिक्षण पद्धत बदलली. त्याबरोबरच शैक्षणिक साहित्यातदेखील बदल झाले. अभ्यास करण्याठी नवनवीन साधने आज उपलब्ध आहेत. टॅॅब, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा वापर करून शाळेत शिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक पद्धतीमुळे पाटी कालबाह्य होत आहे.- मुकुंद फुंदे, प्राथमिक शाळा शिक्षक........सद्यस्थितीत पाटीची मागणी कमी झाली आहे. पूर्वी विविध पद्धतीच्या पाट्या विक्रीसाठी बाजारात असायच्या. आता मागणी कमी झाल्यामुळे बहुतांश विक्रेते पाट्या विक्रीसाठी ठेवत नाहीत.- विनोद पाटील, शालेय साहित्य विक्रेते ......संकल्पना वाटते. पाटीचा वापर कमी झाल्यामुळे बाजारात विविध आकर्षक रंगात मण्याच्या माळात अडकलेली पाटी दिसेनाशी होत चालली आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण इंग्रजी चौरसाकृती, आडवे, उभे, रकाने असलेले एक रेघी, दोन रेघी, तीन रेघी, चार रेघी, वही बाजारात सहज उपलब्ध आहे. त्यामुळे वहीचा वापर वाढला. पाटीचा वापर कमी झाला.
पाटी-पेन्सिल नामशेष होण्याच्या मार्गावर : इंग्रजी माध्यम शिक्षण पध्दती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 12:48 PM
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नर्सरीपासून ते प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाटी, आणि पेन्सिलचा (लेखन) वापर होताना दिसत नाही.
ठळक मुद्देपाटीकडून टॅबकडे वेगाने प्रवास करणारी शिक्षण प्रणाली