शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

दुर्दैवी! आईचा कोरोनामुळे मृत्यू, सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 3:18 PM

बारामती तालुक्यातील ढाळे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर

मेखळी: काही दिवसांपूर्वी आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आलेल्या मुलीवर देखील सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील जळोची गावात राहणाऱ्या ढाळे कुटुंबियांच्या वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवार (दि.२१ मे) रोजी जळोची येथे मनीषा ठोंबरे यांचा सुर्पदंशामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच आई सरूबाई बंडा ढाळे (रा.जळोची) यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनीषा ठोंबरे (रा.रेडणी,इंदापूर) या ठिकाणाहून जळोची गावात आल्या होत्या.

राहत्या घरी सकाळी साडेसातच्या दरम्यान झाडलोट करत असताना त्यांना पायाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी साप पाहिला पण साप अडचणीत गेल्याने परत दिसला नाही.सर्पदंशानंतर त्यांना तात्काळ बारामती येथे उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु त्यांना वाटेतच जास्त त्रास होऊ लागला.सर्पदंशावर उपचारासाठी लागणारे व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी ठोंबरे यांना बारामती मधील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये फिरवले मात्र कोरोनामुळे बेड कमी असल्यामुळे त्यांना बेड उपलब्ध झाला नाही व यादरम्यान त्यांचा सकाळी १० च्या दरम्यान  मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथुन त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. त्यांना तीन वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा एक मुलगा आहे. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास कुटुंबियांना त्याच जागेवर कपडे धुण्याच्या मशिनजवळ फरशीखाली जाताना एक साप दिसला असता ढाळे कुटुंबियांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना फोन करून पाचारण केले. सर्पमित्र जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फरशी खाली लपलेला तीन फूट लांबीचा 'इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा' जातीच्या विषारी नागाला मोठ्या शिताफीने पकडले. सर्पमित्र अमोल जाधव यांनी कुटुंबियांचे सांत्वन करून सदरील विषारी नागाला बारामती वनविभागाच्या ताब्यात दिले. वन कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले.

टॅग्स :BaramatiबारामतीsnakeसापWomenमहिलाDeathमृत्यू