शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

दिग्गज उमेदवारांमध्ये होणार लढत

By admin | Published: October 12, 2016 3:00 AM

महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील मॉडेल एरिया म्हणून चर्चेत आलेले औंध व हॅरिस ब्रिज मार्गे शहराचे प्रवेशद्वार असलेले बोपोडी अशा दोन प्रमुख

पुणे : महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील मॉडेल एरिया म्हणून चर्चेत आलेले औंध व हॅरिस ब्रिज मार्गे शहराचे प्रवेशद्वार असलेले बोपोडी अशा दोन प्रमुख विभागांचे एकत्रीकरण करून प्रभाग क्रमांक ८ तयार करण्यात आला आहे. या प्रभागामध्ये २ माजी महापौरांसह आजी-माजी नगरसेवक असलेले दिग्गज उमेदवार आमनेसामने येणार असल्याने अटीतटीची लढत पाहायला मिळेल. चार सदस्यीय प्रभागांची रचना करताना ८५ हजार लोकसंख्येचे बंधन घालण्यात आले होते. औंध-बोपोडी या प्रभागाची लोकसंख्या ८४ हजार ४०६ इतकी असून तो शहरातील मोठ्या प्रभागांपैकी एक बनला आहे. आरक्षण सोडतीमध्ये या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती (एससी) महिला, इतर मागासवर्ग (ओबीसी) महिला व दोन जागा खुल्या गटासाठी पडल्या आहेत.यशदा, सिंध सोसायटी, मानससरोवर, पंचवटी, सुवर्ण युग सोसायटी, विधाते कॉलनी, औंध रोड, औंध आयटीआय रोड आदी उच्चभ्रू सोसायट्यांचा भाग या परिसरात समाविष्ट झाला आहे. त्याचबरोबर बोपोडी गावठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कस्तुरबा वसाहतीचा काही भाग आदी झोपडपट्टीचा परिसर येत आहे. बोपोडीमध्ये दक्षिण भारतीयांची संख्या मोठी आहे, ते अनेक वर्षांपासून तिथले स्थानिक रहिवाशी आहेत. त्यामुळे उच्चभ्रू, गरीब, मध्यमवर्गीय, मूळचे पुणेकर, स्थलांतरित, परप्रांतीय अशा संमिश्र स्वरूपाच्या मतदारांनी हा प्रभाग बनला आहे.महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत बोपोडीच्या प्रभागातून प्रकाश ढोरे व अर्चना कांबळे हे मनसेचे नगरसेवक विजयी झाले होते. प्रकाश ढोरे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अनुसूचित जाती महिला या जागेवरून अर्चना कांबळे मनसेकडून पुन्हा लढणार आहेत. औंधमधून काँग्रेसकडून संगीता दत्तात्रय गायकवाड व सनी निम्हण विजयी झाले होते. सनी निम्हण यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक कैलास गायकवाड, संगीता गायकवाड, बाबूराव चांदेरे यांच्या प्रभागातील काही भाग या ४ सदस्यीय नवीन प्रभागात समाविष्ट झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुल्या जागेवरून श्रीकांत पाटील, बाळासाहेब रानवडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी महापौर सुरेश शेवाळे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपातर्फे या प्रभागातून उभे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेसकडून माजी महापौर दत्तात्रय गायकवाड हेदेखील उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, शैलजा खेडेकर यादेखील काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मनसेकडून औंध भागातील नाना वाळके इच्छुक आहेत. अनेक दिग्गज उमेदवार या भागात आमनेसामने येत असल्याने अत्यंत चुरशीची लढत या ठिकाणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उमेदवारांकडून सध्या चाचपणी सुरू असून कार्यकर्त्यांचा बैठका, भेटीगाठी यांना सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)