पुणे : साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सम्राट नाईक (वय ६७ ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत त्यांचे सक्रिय योगदान होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
नाईक हे उत्तम ढोलकीवादक होते. ते इतर कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करीत असत. गायनाची देखील त्यांना विशेष आवड होती. मराठी-हिंदी चित्रपट गीते गाण्यात त्यांचा हातखंडा होता. कराओकेवर वाद्यवृंद जमवून ते गाण्यांचे कार्यक्रम करत असत. त्यांनी वडिलांच्या नावे स. शि. नाईक प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असत. अनेक संस्थांच्या विविध उपक्रमांमध्ये ते हिरिरीने स्वयंसेवक म्हणून सहभागी होत असत. अपेक्षा मासिकाचे सहसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते.
-----------------------------------------