मुंबई - भेंडीबाजार घराण्याचे बुजुर्ग गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी ( 7 नोव्हेंबर ) रात्री पुण्यात निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या अविवाहित होत्या. बुधवारी सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1944 रोजी झाला.
शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनपं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. सूर-सिंगार संसद, मुंबई तर्फे त्यांना सुरमणी पुरस्कार तर गानवर्धन पुणेतर्फे स्वर-लय भूषण, संगीत शिरोमणी पुरस्कार, पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानतर्फे संगीत मर्मज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भेंडीबाजार घराण्याची गायकीचा वारसा पुढे नेत निगुनी या टोपणनावाने त्यांनी बंदिशींची रचना केली. आकाशवाणीच्या अ.भा.गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वाच्च पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती.