पुणे : देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांचे नातू ज्येष्ठ गायक सुधीर तथा माधव अनंत दातार (वय ७२) यांचे शनिवारी (दि. ९) निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांची तब्येत खालावली होती. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी गायिका शैला दातार, मुलगी शिल्पा पुणतांबेकर, मुलगा हृषीकेश दातार, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.
अभिजात संगीताचा वारसा सुधीर दातार यांना कुटुंबातूनच मिळाला. पं. राम मराठे यांच्याकडून त्यांनी अनेक वर्षे संगीताची तालीम घेतली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. गजाननबुवा जोशी, स्वराराज छोटा गंधर्व अशा अनेक दिग्गज मंडळींचा त्यांना सहवास लाभला.
'''''''' स्वरानंद'''''''' संस्थेच्या ''''''''आपली आवड'''''''', ''''''''मंतरलेल्या चैत्रबनात'''''''', या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या '''''''' कट्यार काळजात घुसली'''''''' या नाटकात साकारलेल्या मोठा सदाशिव च्या भूमिकेसाठी त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.
पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाजाचे ते कार्याध्यक्ष होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी भास्करबुवांच्या या संगीत वास्तूची मनोभावे सेवा केली.
......