इंदापूर : सख्ख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणा-या तालुक्यातील बाभुळगावच्या उपसरपंचास इंदापूर पोलीसांनी सोमवारी (दि.७) रात्री अटक केली.त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे,फरशी, कु-हाड अशी प्राणघातक शस्त्रे जप्त केली. इंदापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी वामन देवकर (रा.बाभुळगाव,ता.इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक महेश रामचंद्र माने यांनी त्याच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय वामन देवकर (रा.बाभुळगाव,ता.इंदापूर) यांनी आपला भाऊ धनाजी देवकर हा विहिरीच्या पाण्याच्या वादावरुन आपल्याशी भांडण करत आहे. कु-हाड घेवून आपल्या मागे लागला आहे. पिस्तूल दाखवून तुला उद्यापर्यंत ठेवत नाही, अशी धमकी देत असल्याची तक्रार यांनी केली. त्याची तातडीने दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरुध्द तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकरहे पथकासह आरोपीच्या घरी गेले. पोलिसांनी आरोपीकडील फरशी, कु-हाड, जिवंत काडतुसे आदी शस्त्रे जप्त करत त्याला अटक केली. अधिक तपास फौजदार डी.एस. कुलकर्णी करत आहेत.
सख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या उपसरपंचाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:07 PM
विहिरीच्या पाण्याच्या वादावरुन सख्ख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणा-या उपसरपंचास अटक केली
ठळक मुद्देआरोपीकडील फरशी, कु-हाड, जिवंत काडतुसे आदी प्राणघातक शस्त्रे जप्त