लोकमत न्यूज नेटवर्क
लोणीकंद : ऐतिहासिक विजयरण स्तंभ येथे १ जानेवारीला होणारा अभिवादन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे मानवंदना कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रतिकात्मक व साधे पध्दतीने शांततेत होईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख केले.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजय रण स्तंभ भुमित १ जानेवारीला होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाच्या तयारीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उप विभागीय अधिकारी सचिन बारवकर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली तहसिलदार सुनिल कोळी, शिरुरचे तहशिदार लैला शेख, नायब तहशिलदार श्रीशैल वट्टे, कार्यकारी अभियंता जे. ए. थोरात, किशोर शिगोंटे, अ. द. कोकाटे, सी. एम. ढवळे, कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सुदामराव पवार, सरपंच रुपेश ठोंबरे, शिवाजी वाळके, हरिभाऊ सरडे, विशाल सोनवणे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, देश गेल्या ८-९ महिन्यांपासून कोरोना विषाणूंचा सामना करीत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रम यामुळे आपण रद्द केले आहेत. प्रशासनास कुठलीही जात व धर्म नसतो. कोरोना विषाणूचा प्रभाव संपला असे म्हणता येणार नाही. यामुळे दरवर्षी साधेपणाने होणारा मानवंदन सोहळा यावर्षी प्रातिनिधीक स्वरूपात साध्या पद्धतीने होईल. गरीकानी सहकार्य भुमिका ठेवत प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले.
चौकट
या वर्षी कोरोना विषाणू महामारीमुळे प्रशास विजयस्तंभ मानवंदना सोहळा हा प्रतिकात्मक सरुपात साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. प्रशासनाला व पोलीस यंत्रणेला आमचे पूर्ण सहकार्य राहिल.
- सर्जेराव वाघमारे, अध्यक्ष कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समिती