शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

22 सेकंदात विजय, त्यासाठी 22 वर्षे तप; हमालाच्या पोराची कमाल कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 7:55 AM

महाराष्ट्र केसरी सिकंदर...

- डाॅ. समीर इनामदारपुण्यातल्या फुलगाव इथं शुक्रवारी झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदांत झोळी डावावर अस्मान दाखवत सिकंदर शेखने विजेतेपद पटकावले. लहानपणापासून बाळगलेलं स्वप्न सत्यात येताना सिकंदरची छाती अभिमानानं फुलली होती. ‘जो जिता वही सिकंदर’ हे त्यानं खरं करून दाखवलं.

गतवर्षी तांत्रिक मुद्यावरून पराभव पत्करलेल्या सिकंदरनं यावर्षी महाराष्ट्र केसरी जिंकायचाच या उद्देशाने वर्षभर सराव केला अन् पुण्यात ६६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अवघ्या २२ सेकंदांत जेतेपद पटकावले. त्यासाठी त्याला २२ वर्षांची खडतर तपस्या करावी लागली. ध्येय आता जरी दृष्टीपथात आलं असलं तरी त्यामागचा संघर्ष, कष्ट आणि हलाहल पचवावे लागले, ही साधी बाब नव्हती.

सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथला. वडील रशीद यांनाच कुस्त्यांचा नाद असल्यानं आपल्या पोरांना पहिलवान करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यासाठी त्यांनी पडेल ती कामं केली. अगदी मार्केट यार्डात हमालीसुद्धा केली. वस्ताद चंदू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर मोहोळच्या फाटे तालीम, सिद्ध नागेश तालमीत जाऊ लागला. लहान-मोठ्या कुस्त्या करू लागला अन् जिंकूही लागला. दरम्यान, आजारामुळं वडिलांचं हमालीचं काम सुटलं. मग जबाबदारी मोठा मुलगा हुसेननं पेलली. आपल्या भावाला पुढं न्यायचं, या उद्देशानं सिकंदरला अठराव्या वर्षी कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत ठेवण्यात आलं. त्यानंतर सिकंदर सुसाट सुटला. 

सिकंदर महाराष्ट्र केसरी होणार, असं नक्की बोललं जायचं. २०२२ साली तो गादी गटात अंतिम फेरीत त्याच्या गावाशेजारी म्हणजे मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाडकडून गुणावर त्याचा पराभव झाला अन् इथं सारी बाजी पलटली. त्याच्यावर अन्याय झाला म्हणून सोशल मीडियावर प्रचंड लिहिलं गेलं. त्यानंही पुढच्या वर्षी आणखी जोमाने लढू, अशी भूमिका घेतली. एका लक्ष्यासाठी तो लढत राहिला अन् त्यानं जिंकून दाखवलं. 

लष्करात भरती झालासगळी सोंगं करता येतात; पण पैशाचं नाही, हे लहानपणापासून मनावर गोंदलं असल्याने सिकंदर २०१९ साली भारतीय लष्करात भरती झाला. सैन्यदलाकडून तो खेळतो. आपल्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरताना तो जितका भावनिक होतो, तितकाच त्याला अभिमानही आहे.

पांडुरंगालाही साकडे सिकंदर महाराष्ट्र केसरी व्हावा, म्हणून त्याच्या वडिलांनीही पाच वेळच्या नमाजबरोबरच पंढरीच्या पांडुरंगाला अन् मोहोळच्या नागनाथाला साकडं घातलं होतं. सिकंदरचा हा विजय वादातीत तर आहेच त्यासोबतच एका जिद्दी, परिश्रम करणाऱ्या अन् पराभवाने खचून न जाता आपले लक्ष्य साध्य करणाऱ्या खेळाडूचा पण तितकाच आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध जिद्दीनं खेळी केलेल्या मॅक्सवेलसारखा.