लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत लॉ चार्जर्स, डेक्कन वॉरियर्स आणि टेनिस टायगर्स या संघांनी विजयी सलामी दिली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ड गटात नितीन खैरे, श्रीनिवास रामदुर्ग, पराग चोपडा, कल्पक पत्की, समीर बाफना, राहुल मंत्री यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर लॉ चार्जर्स संघाने सोलारिस डायनामोज संघाचा २४-११ असा पराभव करून विजयी सलामी दिली.
दुसऱ्या सामन्यात फ गटात टेनिस टायगर्स संघाने ओडीएमटी ब संघाचा २४-०६ असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून सुरेश घुले, जितेंद्र जोशी, संतोष जयभाई, राहुल पंढरपुरे, शिवाजी यादव, अभिजित मराठे, केतन जाठर, गोपी जयभाई यांनी सुरेख कामगिरी केली. अन्य लढतीत ब गटात डेक्कन वॉरियर्स संघाने ऋतुपर्णा डायनामाईट्स संघाचा २४-०८ असा पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
गटसाखळी फेरी :
गट ड : लॉ चार्जर्स वि.वि. सोलारिस डायनामोज २४-११, १०० अधिक गट : नितीन खैरे/श्रीनिवास रामदुर्ग वि.वि. रवी भांडेकर/दिपक दिसा ६-५ (७-२);
९० अधिक गट : पराग चोपडा/कल्पक पत्की वि.वि. मंदार काळे/दिपू गलगली ६-०;
खुला गट : समीर बाफना/राहुल मंत्री वि.वि. संतोष दळवी/कुणाल पुराणिक ६-४;
खुला गट : नितीन खैरे/प्रकाश पी. वि.वि. यशराज उभे/पार्थ सहस्त्रबुद्धे ६-२;
गट फ : टेनिस टायगर्स वि.वि. ओडीएमटी ब २४-०६
१०० अधिक गट : सुरेश घुले/जितेंद्र जोशी वि.वि. ज्ञानेश्वर जैद/राहुल पाटील ६-१; ९०
अधिक गट : संतोष जयभाई/राहुल पंढरपुरे वि.वि. राम नायर/ज्ञानेश्वर काटकर ६-०;
खुला गट : शिवाजी यादव/अभिजीत मराठे वि.वि. पीयूष खंडेलवाल/ऋषिकेश घारे ६-१;
खुला गट : केतन जाठर/गोपी जयभाई वि.वि. राहुल पाटील/राज कपूर ६-४;
गट ब : डेक्कन वॉरियर्स वि.वि. ऋतुपर्णा डायनामाईट्स २४-०८
१०० अधिक गट : एन भावे/ए पाटणकर वि.वि. अनिल रामोद/निखिल देशपांडे ६-२; ९०
अधिक गट : पराग देसाई/ए आठवले वि.वि. केदार राजपाठक/नितीन झामवर ६-१;
खुला गट : के पाठक/व्ही उंबरानी वि.वि. अनिल रामोद /संजय कटारिया ६-०;
खुला गट : आदिल खालिद/विजय गोखले वि.वि. नारायण आघव/नितीन लाहोटी ६-५ (७-४)