गराडे दि.२३ ( वार्ताहर )
सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतो. जनसेवेमुळे नवखंडेनाथ ग्रामविकास पॅनेलचा ११ - ० ने मोठा विजय झाला, असे प्रतिपादन कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांनी केले.
दुरकरवाडी ( ता. पुरंदर ) येथे ग्रामस्थांच्या वतीने पॅनेलप्रमुख गंगाराम जगदाळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी जगदाळे बोलत होते.
या वेळी शिवसेना नेते विजय ढोणे, भाजप युवानेते साळुंके, हनुमंत उद्योजक पांडुरंग जगदाळे , गराडे ग्रामापंचायत माजी उपसरपंच संजय रावडे,बाळासाहेब रावडे,सुदाम जगदाळे ,चेअरमन बाळासाहेब दूरकर,नारायण दूरकर, बापूसाहेब दूरकर,विलास दूरकर,निवृत्ती दूरकर,शंकर दूरकर,म्हस्कू दूरकर,सतिश दूरकर,चंद्रकांत दूरकर उपस्थित होते.
राजकीयदृष्टया महत्त्वाच्या गराडे ( ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायतीवर नवखंडेनाथ ग्रामविकास पॅनेलने प्रतिस्पर्धी नवखंडेनाथ महाआघाडी पॅनेलचा ११ - ० ने पराभव करीत दणदणीत विजय संपादन केला. गराडे ग्रामापंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
गराडे गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करून बाबाराजे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कामे जलदगतीने करणार असल्याचे गंगाराम जगदाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब दूरकर यांनी केले. आभार नारायण दूरकर यांनी मानले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: नितीन विठ्ठल जगदाळे ,अनिता दीपक जगदाळे ,अमित मधुकर दूरकर,हरिश्चंद्र म्हस्कू वाडकर,ललिता विजय जगदाळे ,सुप्रिया विशार रावडे,समीर विठ्ठल तरवडे,गीतांजली विजय ढोणे,नवनाथ सर्जेराव गायकवाड ,सुजाता निलेश कुंभार ,स्वप्नाली विजय जगदाळे.
२१गराडे
दुरवकरवाडीत पॅनेलप्रमुख गंगाराम जगदाळे यांचा सत्कार करताना गुलाब दूरकर व राजाराम दूरकर.