लोकमत न्यूज नेटवर्कउंड्री : पिसोळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने १३ पैकी ९ जागा जिंकून सत्ता परिवर्तन केले. मागील १५ वर्षांपासून पद्मावती ग्रामविकास पॅनेलचे ग्रामपंचायतवरील वर्चस्व संपुष्टात आले आहे. यावेळी अत्यंत चुरशीची लढत दोन्ही पॅनेलमध्ये पहावयास आली. ग्रामपंचायतच्या मागील पंचवार्षिक कालावधीत ३ वॉर्डमध्ये ९ सदस्य संख्या होती, यावेळेस मतदारसंख्या वाढल्याने वॉर्डची फेररचना होऊन ५ वॉर्डांत १३ उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे विक्रमी उमेदवारी अर्ज भरले गेले होते. यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. विजयी उमेदवारात विद्यमान सरपंच स्नेहल दगडे, विद्यमान सदस्य रंजना मासाळ, किरण येप्रे, माजी सदस्य नवनाथ मासाळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मच्छिंद्र दगडे यांचा समावेश आहे.वॉर्ड क्रमांक १ मधील ३ जागांसाठी रेश्मा कांबळे यांनी संजय कदम यांचा ३८१ मतांनी पराभव केला, तर स्नेहल दगडे यांनी सुनीता गवळी यांचा ३५४ मतांनी पराभव केला व दीक्षा निंबाळकर यांनी सारिका कांबळे यांचा तब्बल ४४९ मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक २ मधील ३ जागांसाठी रंजना मासाळ यांनी दगडे स्नेहा यांचा २२६ मतांनी पराभव केला, तर मंगेश मासाळ यांनी आकाश धावडे यांचा २१४ मतांनी पराभव केला व प्रज्ञा दगडे यांनी उषा धावडे यांचा ३१० मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक ३ मधील ३ जागांसाठी मच्छिंद्र दगडे यांनी अमोल काळभोर यांचा १८८ मतांनी पराभव केला, तर आश्विनी कदम यांनी रेश्मा कांबळे यांचा २६९ मतांनी पराभव केला व आशा काळभोर यांनी मुक्ता दगडे यांचा २९२ मतांनी पराभव केला. वॉर्ड क्रमांक ४ मधील २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दीपक धावडे यांनी मुकुंद मासाळ यांचा ६१ मतांनी पराभव केला, तर प्रीती कदम व संध्या कदम या दोन्ही उमेदवारांना २७८ मते मिळाल्याने या जागेसाठी दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी टाकल्यावर त्यात संध्या कदम यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने विजयी घोषित करण्यात आले. वॉर्ड क्रमांक ५ मधील २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नवनाथ मासाळ यांनी विद्यमान उपसरपंच गणपत दगडे यांचा १३८ मतांनी पराभव केला, तर किरण येप्रे यांनी आकाश काळभोर यांचा १८५ मतांनी पराभव केला. पिसोळीतील ग्रामस्थानी आमच्या पॅनेलच्या बाजूने जो कौल दिला आहे, त्याच्या विश्वासास आम्ही पूर्णपणे पात्र ठरू व गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करू, असे मनोगत यावेळी पॅनेल प्रमुख रामचंद्र मासाळ व नवनाथ मासाळ व्यक्त केले. सरपंच पदासाठी नवनाथ मासाळ यांचे नाव आघाडीवर आहे.सरपंचपदाच्या निवडणुकीवर होणार परिणाम?उंड्री ग्रामपंचायतच्या एकूण असलेल्या १७ जागा पैकी १२ जागा बिनविरोध झाल्याने फक्त २ वॉर्डातील ५ जागांसाठी निवडणूक झाली होती. यात वॉर्ड क्रमांक ४ मध्ये २ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गणेश पुणेकर यांनी विजय टकले यांचा ११६ मतांनी तर विद्यमान सदस्या जयश्री पुणेकर यांनी पूजा चौधरी यांचा १४४ मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक ५ मधील ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुभाष घुले यांनी विद्यमान उपसरपंच वसंत कड यांचा ६८ मतांनी तर भाग्यश्री कदम यांनी ज्योती कदम यांचा १५१ मतांनी व दीपाली टकले यांनी मनीषा कड यांचा ९८ मतांनी पराभव केला. या पाचही जागा निवडून विरोधकांनी मुंसडी मारली आहे. या निकालाचा पुढील महिन्यात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत.
पिसोळीत सत्ताबदल, उंड्रीत विरोधकांची बाजी
By admin | Published: May 30, 2017 3:04 AM