विजय आमचाच होणार...! रवींद्र धंगेकरांचा विश्वास; पुण्यातून 'मविआ'अर्ज दाखल करण्यासाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:19 AM2023-02-06T11:19:33+5:302023-02-06T11:24:04+5:30
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर
पुणे : कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार आहेत. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत असल्याचे नाना पाटोळे यांनी ट्विट करून सांगितले आहे.
भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी धंगेकर यांच्याबरोबर जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल कारण्यासाठी रवाना झाले आहेत. रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती.झाले आहेत. रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती.
महाविकास आघाडीची एकजूट हाच विजय
महाविकास आघाडीची एकजूट झाल्यावर विजय आमचाच होतो. असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. आम्ही तिन्ही पक्ष मिळून एकत्रित हि निवडणूक लढणार आहोत असेही धंगेकर यावेळी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 6, 2023
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.