पुणे : रसिक पुणेकरांच्या कथा अापण नेहमीच एेकत असताे. काल सर्वांना त्याचा प्रत्यय सुद्धा अाला. पुण्यभूषण दिवाळी अंकाचा प्रकाशन साेहळा सुरु असताना अचानक जाेरदार पाऊस अाला. सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळे पावसापासून वाचण्यासाठी अाडाेसा शाेधत असताना एक पुणेकर अाजाेबा मात्र अापल्या खुर्चीवर बसून राहिले. अायाेजकांनी त्यांना मंचवार येण्याची विनंती केली असता ' मी मस्त एंजॉय करतोय पाऊस ! मला कोरडया जागेत , पावसापासून वाचवण्याची धडपड नका करू ! अशी विनंती त्यांनी अायाेजकांना केली. या प्रकरणामुळे हे पुणेकर काकांची रसिकता चर्चेचा विषय झाली अाहे.
शुक्रवारी पुण्यभूषण दिवाळी अंकाचा प्रकाशन साेहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणे, डाॅ. सतिश देसाई, मुकुंद टाकसाळे, डाॅ. सुरेश तलाठी, सुधीर गाडगीळ, बाळासाहेब अनासकर अादी मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रम सुरु असताना अचानक जाेरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्याने अनेकांनी मंचावर धाव घेतली तर काहींनी खुर्च्या डाेक्यावर धरल्या. एक अाजाेबा मात्र भर पावसात अापल्या खुर्चीवर बसून हाेते. हे पाहून पुण्यभूषणचे स्वयंसेवक त्यांना मंचावर घेऊन येण्यासाठी धावले. त्यावेळी ' मी मस्त एंजॉय करतोय पाऊस ! मला कोरडया जागेत , पावसापासून वाचवण्याची धडपड नका करू ! असे ते अायाेजकांना म्हणाले. या सगळ्याचे सर्वांनाच अाश्चर्य वाटले. अाजाेबांच्या रसिकतेचे सर्वांनीच काैतुक केले. त्यांना पुण्यभूषण चे स्वयंसेवक , सहकारी मिलिंद बर्वे यांनी पूर्ण कार्यक्रम भिजत -भिजत साथ दिली. दाेघेही संपूर्ण कार्यक्रम हाेईपर्यंत भिजत पावसात बसून राहिले.