शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

VIDEO : भोरड्यांची माळ फुले! पक्षांचा मुक्त संचार पाहून हरखून गेले पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 10:30 PM

बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या  पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन  भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे  - बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या  पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन  भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.भोरड्यांचे नृत्याचे राज्यासह देशातील पर्यटकांना आकर्र्षण आहे. त्याला अभिनेते देखील अपवाद नाहित. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी कुटुंबियांसह शनिवारी (दि १०) भोरड्यांचे नृत्य पाहण्याचा आनंद लुटला. संध्याकाळच्या वेळेत आकाशात मोठ्या संखेने  भोरड्या एकत्रित येतात. एकत्र झालेल्या भोरड्या हळूहळू विविध कसरती, नृत्य, एरो मोडलिंग करायला सुरुवात करतात. हा नृत्य प्रकार साधारणपणे तासभर सुरु असतो. १ लाखांपेक्षा जास्त भोरड्या एकत्रित नृत्य करताना पाहण्याचा आनंद  अवर्णनीय असल्याचे येथील पर्यटक सांगतात. काही स्थानिक पक्षी  कावळे, घारी, बगळे यांच्या मध्ये येणाया प्रयत्न करतात. मात्र यांच्या कवायती मध्ये कसलाच खंड पडत नाही हे विशेष. भोरड्या जे नृत्य करतात याला इंग्रजी मध्ये ‘मुरमुरेशन’ म्हणतात. पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी ‘लोकमत’ शी बोेलताना सांगितले की, पूर्व युरोप , रशिया, फिनलंड, सिंध प्रांत या भागातून भोरड्या लाखोंच्या संखेने भारतात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेल्लांगना, कर्नाटक, आंध्र, गुजरात, राजस्थान सह दरवर्षी येत असतात. अगदी जुलै पासून भारतात यायला सुरुवात होते. मात्र, महाराष्ट्रात अगदी उशिरा नोव्हेंबर मध्ये यायला सुरुवात होते. या भोरड्या हिमालयाच्या शिखराणा पार करून येत असतात. साधारणपणे स्थलांतर करण्यापूर्वी त्यांचा विणीचा हंगाम संपलेला असतो. थंडी पडायला सुरुवात झालेली असते.मग पिलांना खाद्य अपुरे पडू लागते .कारण हजारोंच्या संख्येने असल्यामुळे खाद्य कमी पडू लागते. शिवाय यांच्या मूळ भागात कडाक्याची थंडी पडू लागल्याने खाद्य कमी होत असते .परिणाम काहीना खाद्यही मिळत नाही परिणाम मृतू होत असतात. आणि मग स्थलांतर करायला सुरुवात करतात. यात काही जुने नर व माद्या आणि त्यांच्याबरोबर नवीन तयार झालेली पिढी निघते जवळपास २०००० किमी चा प्रवास करायला. मग एकट्याने प्रवास केला तर उर्जा जास्त लागेल, म्हणून एकत्रित प्रवास करून उर्जा बचत आणि जास्त प्रवास केला जातो. यात यु इंग्रजी आकार करून हवेतील प्रवास केल्यास उर्जा बचत होते. एका पंखाला आराम मिळतो.  हवेचा वेग कमी होतो आणि वेगही वाढतो.  त्यांंच्या खाद्यात जवळपास ९७ टक्के कीटक असून ३ टक्के एवढेच फळ, बिया यांचा समावेश आहे.गवतातील नाकतोडे, टोळधाड, अनेक कीटकांच्या आळयाचा समवेश असतो.सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्यात कीटकांचे मिलन आणि आळी अवस्था असताना या भोरड्या प्रवेश करतात .त्यामुळे मोठ्या प्रमाणात कीडनियंत्रण केली जाते. यामुळे यांचा आपल्या भागातील ज्वारीचे पिक मोठे होण्यासाठी मदत होत असते. म्हणून थोडी ज्वारी खाल्ली तरीदेखील यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.एक भोरडी एक दिवसात २०० ग्राम पेक्षा जास्त कीटक खात असते. यात कीटकांच्या अळ्याचे प्रमाणत जास्त असते. त्यामुळे कीडनियंत्रन मोठ्या प्रमणात केले जाते. अनेक झाडांचे परागीभवन करणेसाठी मोठ्या प्रमाणात मदतही करीत असतात, यात पळस, पांगारा, वड, उंबर, गवताच्या बियासह अश्या अनेक झाडांच्या बिया खाऊन बीज प्रसारक म्हणून काम करीत आहेत. हे पक्षी वसाहत म्हणजे राहण्याचे ठिकाण दरवर्षी बदलत असतात. यावर्षी तलाव, तर कधी काटेरी साधी बाभूळ वने, तर कधी उसाचे पिक, तारा अश्या विविध ठिकाणी त्यांचे अधिवास आढळून येतात. यांच्या वसाहतीला अजिबात त्रास देऊ नये. या पक्ष्यांना कोणी उपद्रव करीत असल्यास  वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्र