शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

पीडित मुलीवरील अत्याचाराचे केले होते व्हिडिओ चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे आरोपी आणि पीडित मुलीने सांगितले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे आरोपी आणि पीडित मुलीने सांगितले असून, तब्बल ९ ठिकाणी नेऊन आरोपींनी मुलीवर अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींंना या गुन्ह्यात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी १४ आरोपींना एस.पी पोंक्षे कोर्टाने आणखी चार दिवसांची, तर अजून दोन आरोपींना २६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय 27 रिक्षाचालक, वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय 32), रफिक मुतर्जा शेख (वय 32), अझरूददीन इस्लमामुददीन अन्सारी (वय 27), प्रशांत सॅमिअल गायकवाड (वय 32), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय 29 वर्षे), नोईब नईम खान (वय 24), असिफ फिरोज पठाण (वय 36), मिराअली उर्फ मिरा अजीज शेख (वय 26), शाहजुर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (वय 28), समीर मेहबूब शेख (वय 19), फिरोज उर्फ शाहरू ख साहेबलाल शेख (वय 22), महबूब उर्फ गौस सत्तार शेख (वय 23) आणि मोहम्मद उर्फ गोलू मोज्जाम आलम (वय 19) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर मेहबूब बादशाह शेख (वय 27) आणि इस्माईल लतीफ शेख ( वय 36) या दोघांना बुधवारी (15) अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात आणले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तेरा आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाखल गुन्हयामध्ये भा.दवि कलम 376 (ड) (अ), 377, 34 व लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4(2), 5 (ग), 6,8,12 प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्हयाचा अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार १४ आरोपींना २० सप्टेंबरर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

------------------------------------------------