शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Video: मेंढ्या धावल्या रिंगणी...! गजर हरिनामाचा...! इंदापूरात तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 5:26 PM

हरिनामाच्या गजरात अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत मेंढ्या धावल्या रिंगणी

गजानन हगवणे 

काटेवाडी : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि १८ ) रोजी इंदापूरात तालुक्यात दाखल झाला. काटेवाडी( ता.बारामती) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई दुर होण्यासाठी पालखी रथाभोवती गोल रिंगण घालून मनोभावें वंदन केले. त्या वेळेपासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रध्देने जपली आहे. सोमवार( दि.18 )रोजी दुपारी काटेवाडी (ता.बारामती) येथे धोतराच्या पायघडया अंथरूण जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी 3 वाजता संभाजी काळे ,तात्यासो मासाळ ,महादेव काळे ,सुभाष मासाळ,  हरि महारनवर, यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालुन मेंढ्यांनी रिंगण पुर्ण केले. 

यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. बारामती शहरातून शनिवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिपंळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत पवाराच्या काटेवाडीत विसावला. पालखी स्वागतासाठी परिट समाजातील ननवरे बांधवांच्या  वतीने धोतराच्या पायघडया घालण्यात आल्या. गावच्या वेशीतून बॅडपथक, शालेय लेझिमपथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात  नेण्यात आली. या पालखी सोहळ्याचे उद्योजक रणजित पवार, शरयु फौडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार , छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, संरपच विद्याधर काटे उपसंरपच श्रीधर घुले, नियोजन मंडळाचे सदस्य पांडूरग कचरेआदींनी स्वागत केले. पालखी सोहळा दर्शन मंडपात विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी येथे पालखी च्या स्वागतासाठी पताका,स्वागत कमानी,लावून परिसराची सजावट केली होती. तर दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. 

रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तत्पुर्वी बारामती ट्रेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पालखी दर्शन मंडपात श्री संत तुकाराम महाराज यांची आरती केली व सोहळ्याच्या स्वागताची उणीव राहू नये यासंबधी पाहणी केली. तहसीलदार गणेश शिदे गटविकास अधिकारी अनील बागल, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यानी तालुक्याच्या वतीने निरोप दिला. काटेवाडी च्या रिंगण सोहळ्यानंतर इदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Socialसामाजिक