ठळक मुद्दे या घटनेचा व्हिडीअाे अाता समाेर अाला असून त्यात ही घरे पडतानाची थरारक दृश्ये कैद झाली अाहेत. पाण्याच्या जाेरामुळे घरे नाल्यात काेसळल्याचे या व्हिडीअाेत दिसून येत अाहे. तसेच अनेक घरातील सामान पाण्यासाेबत वाहून गेल्याचेही यात स्पष्ट दिसत अाहे.
पुणे : मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरल्याने या भागातील घरे पत्त्यासारखी काेसळली. पाण्याचा वेग इतका हाेता की नाल्याला लागून असणारी संरक्षक भिंत काेसळून घरातील सामान न्याल्यात पडले. या घटनेचा व्हिडीअाे अाता समाेर अाला असून त्यातील दृश्ये शरीराचा थरकाप उडवणारी अाहेत.
गुरवारी मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल वसाहतीतील साधारण दाेनशे घरांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा वेग माेठ्याप्रमाणावर हाेता. त्यात अनेक घरांच्या भिंती तूटून घरातील सामान नाल्यात पडले. सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवीत हानी झाली नसली तरी माेठ्याप्रमाणावर घरांचे नुकसान झाले अाहे.