विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:17 AM2019-09-30T11:17:38+5:302019-09-30T11:20:14+5:30

कोल्हापूर, मुलुंड आणि कोथरूड असे तीन पर्याय चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले होते. त्यांनी कोथरूडची निवड केली आहे.

Vidhan Sabha 2019: Chandrakant Patil Will from a safe place but outside candidate be accepted in Kothrudkar? | विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

Next
ठळक मुद्देपाटील यांची उमेदवारी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांच्या वर्णी घाव करणारी कोथरूड मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवाडी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट याना सर्वाधिक लाखाहून अधिक मताधिक्य देणाºया कोथरूड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. पण बाहेरील उमेदवार कोथरूडकरं स्वीकारणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.
 भारतीय जनता पक्षाला सर्वात सुरक्षित व हक्काचा विधानसभा मतदार संघ म्हणून कोथरूड मतदार संघ आहे. अशा विजयश्री देणाऱ्या मतदार संघात ऐनवेळी या पक्षाने महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन सवार्नाच आश्चर्यचा धक्का दिला आहे. पाटील यांची ही उमेदवारी मात्र येथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व प्रबळ दावेदार असलेले इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वर्णी घाव करणारी ठरली आहे.  या मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच बाहेरच विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील उमेदवार आल्याने कोथरूडकर त्यांचा स्वीकार करून त्यांचा पदरात भरघोस दान टाकतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
 भाजपचा परंपरागत मतदार मोठ्या संख्येने असलेल्या कोथरूड मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवाडी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान करून ही जागा मित्र पक्षाला देऊ केली. पण हा मित्र पक्ष कोण हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यातच विद्यमान आमदार कुलकर्णी तथा नवीन चेहरा म्हणून सर्वात अग्रभागी असलेल्या मोहोळ यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना हा बाहेरचा उमेदवार रुचणार का ? हा मोठा प्रश्न आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्रिमंडळतील प्रमुख मंत्री म्हणून या दोघांनाही त्यांचा स्वीकार करावाच लागेल, परंतु भाजपला मिळणारे मताधिक्य पाटील यांच्या वाट्याला येईल का हा मोठा प्रश्न आहे.
 दरम्यान काँगेस आघाडीने 
अद्याप येथील उमेदवार जाहीर केला नसला तरी पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता नवीन बांधणी होऊ सक्तते का याची ही चाचपणी होणार हे नक्की. तर दुसरीकडे मनसे ही येथे तगडा उमेदवार देऊ शकते. 
मोहोळ यांच्या नावाच्या चर्चेत विद्यमान मनसेच्या वाटेवर अशी चर्चाही या मताफर संघ आत सुरू होती. त्यामुळे कोथरूड भाजपचाच पण उमेदवार कोण यापेक्षा आता विजय कोथरूडकरांचा की बाहेरच्या उमेदवाराचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
........
कोथरूड २०१४ (विधानसभा) 
एकूण मतदार :     १, ९७, ३३८
मेधा कुलकर्णी :     १,००,९४१ (भाजप) 
चंद्रकांत मोकाटे :     ३६, २७९ (शिवसेना) 
बाबूराव चांदेरे :     २८, १७९ (राष्टÑवादी) 
किशोर शिंदे :     २१, ३९२ (मनसे) 
उमेश खंदारे :     ६, ७१३  (कॉँग्रेस)


पाटील यांनी थेट जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान राष्टÑवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार देत असतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांना पवारांच्या जिल्ह्यातील मतदारसंघात उतरवून भाजपने मोठी चाल खेळली आहे. त्यामुळे येथील लढत हायप्रोफाईल होणार आहे. 
४स्वत: पवार येथे लक्ष घालतीलच, पण त्याचबरोबर भाजपमधील अंतर्गत समीकरणे पाटील यांचे पुण्यातील स्थान स्वीकारतील का हा प्रश्न आहे. कसबा मतदारसंघात पाटील लढणार अशी चर्चा होती. पण याच समीकरणाने त्यांनी तेथून लढण्यास नकार दिला असल्याचीही चर्चा आहे.  
४ते कोथरूडमध्येही घडविण्याचा प्रयत्नच केला जाणार नाही, असे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे पाटील यांची कसोटी लागणार आहे हे निश्चित.

Web Title: Vidhan Sabha 2019: Chandrakant Patil Will from a safe place but outside candidate be accepted in Kothrudkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.