पुणे : चित्रपट क्षेत्रात क्रांती होत असून चित्रीकरणाचे माध्यम बदलले आहे. आवड म्हणून बघितले जाणारे सिनेमेसुद्धा शिबिरांमध्ये दाखविले जावेत, जेणेकरून चित्रपट बघण्याची दृष्टी बदलेल, असे मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटी आॅफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरतर्फे दहावे रसास्वाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, व्ही. शांताराम फौंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम, चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर, शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार, महाराष्ट्र चॅप्टरचे कार्याध्यक्ष विरेंद्र चित्राव, संदीप मांजरेकर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची विशेष उपस्थिती होती.कुलकर्णी म्हणाले, ‘‘आवड आणि छंद यातील दुवा म्हणजे प्रशिक्षण शिबिर. चित्रपटासारख्या माध्यमाचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी शिबिराचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.’’ (प्रतिनिधी)
तर चित्रपट पाहण्याची दृष्टी बदलेल
By admin | Published: September 07, 2015 4:33 AM