नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला नुकताच मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनासाठीचा आणि तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांक असे दोन पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.वसंतदादा शुगर इस्टिट्यूट मांजरी बु।। येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे पुरस्कार देण्यात आले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, राजेश टोपे, शंकरराव कोल्हे, कल्लप्पा आण्णा आवाडे, जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव नागवडे, बबनराव शिदे, चेअरमन सत्यशील शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.विघ्नहर कारखान्याने कमीत कमी वाफेचा वापर करून साखर उत्पादन, १00 टक्केपेक्षा जास्त गाळप क्षमतेचा वापर, बगॅसची बचत, अत्यल्प वाया जाणाºया साखरेचे प्रमाण, साखरेची उत्कृष्ट गुणवत्ता, साखरउतारा या विषयावर तांत्रिक कार्यक्षमतेचे पारितोषिक मिळाले आहे़ त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रामध्ये गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला आहे. शेतकºयांना एकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळविणेसाठी मार्गदर्शन, पाचट व्यवस्थापन, योग्य खतमात्रा यासाठी गटवार मेळावे घेतले जात आहेत. कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार यांच्या सहकार्यामुळे हे दोन पुरस्कार मिळाले असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले़ विघ्नहर कारखाना नेहमीच शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेत आलेला असल्याचे सांगून शेरकर म्हणाले की, कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला सर्व ऊस विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास गाळपासाठी घालून सहकार्य करावे.
‘विघ्नहर’ला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:09 AM