लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजय विठ्ठल देशमुख यांची बिनविरोध निवड केली. सचिव संजय गोविलकर यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्ला गडावर मागणी सभा झाली.तीन आॅक्टोबर रोजी कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. या चोरीला विश्वस्त मंडळाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा ठपका ठेवत वेहेरगाव ग्रामस्तांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनंत तरे व विश्वस्त यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सात दिवस वेहेरगावातील हार, फुल व प्रसादाची दुकाने बंद ठेवली होती. दरम्यानच्या काळात वेहेरगावातील पाच विद्यमान विश्वस्तांनी गावाच्या मागणीला पाठिंबा देत गावाकडे राजीनामे दिले. पण, अनंत तरे व इतर मंडळी राजीनामा देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. दुसरीकडे वेहेरगावातील पाच व देवघर येथिल दोन अशा सात विश्वस्तांनी ट्रस्टची मागणी सभा घेण्याची मागणी केली होती.शनिवारी कार्ला गडावरील विश्वस्त मंडळाच्या कार्यालयात गोविलकर यांनी सात विश्वस्तांच्या उपस्थितीत सभा झाली. अध्यक्षपदी विजय देशमुख, उपाध्यक्षपदी काळूराम देशमुख व खजिनदारपदी पार्वताबाई पडवळ यांची, सचिवपदी संजय गोविलकर असून इतर विश्वस्त म्हणून निलम येवले, विलास कुटे व नवनाथ देशमुख यांना कायम करण्यात आले.
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:31 AM