कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना, तालुका पंचायत समितीच्या शिफारशीने, जिल्हा परिषदेकडून हा “कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार” दर वर्षी तालुक्यातील एका शेतकऱ्याला दिला जातो. त्यासाठी यंदा विजय कुंजीर यांची निवड करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली तालुका कृषी अधिकारी अमित रणवरे, कृषी विस्तार अधिकारी निकेतन धापटे, अजित घोगरे, अनिलकुमार बागुल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, थेऊर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, युवराज काकडे आदी उपस्थित होते.
पुरस्कारात ११ हजार रुपयांचा चेक, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पैठणी साडी देण्यात आली. पुरस्कार वितारणानंतर, कुंजीर दांपत्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच त्यांच्या घरी व गावात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विजय कुंजीर यांनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलीहाऊस मधील ऑरचिड, ॲथोरिअम, फिनॉलॉपसिस या हायटेक फूलशेतीकडे वळत फुलांची-झाडांची आयात-निर्यात करून तालुक्यात/जिल्ह्यात चांगला नावलौकिक केला आहे.
--
१० थेऊर विजय कुंजीर पुरस्कार
फोटो ओळी : जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा स्वीकारताना विजय कुंजीर व कुटुंबीय.
100821\10pun_4_10082021_6.jpg
१० थेऊर विजय कुंजीर पुरस्कार फोटो ओळी : जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा स्विकारताना विजय कुंजीर व कुटुंबीय