याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव येथील गोळीबार झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलिसांनी तालुक्यात ठिकठिकाणी कोंबिग ऑपरेशन रबविले आहे. ही मोहीम राबवित असताना गुन्हे शोध पथकाला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शुभम राजापुरे पॅरोलवर बाहेर आला असून त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल असून तो तांदूळवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तांदुळवाडी येथे सापळा लावला होता. पोलिसांनी राजापुरेला सापळा रचून अटक केली त्याच्याकडून बनावटीचे पिस्टल त्यामध्ये मॅग्झिन व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजित मुळीक यांनी ही कारवाई केली.
०८०७२०२१ बारामती—१०