वाघोली : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी केसनंद येेथे एकास लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
विकास हरगुडे असे आरोपीचे नाव आहे. हवालदार समीर पिलाणे व दत्ता काळे हे गस्तीवर असतांना हरगुडे हा पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी केसनंद येथे सापळा रचला आणि त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतूस असलेले मॅगझीन जप्त केले. ही कारवाई हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समिर पिलाणे, दत्ता काळे, नाथा जगताप, उमेश गायकवाड, ऋषीकेश व्यवहारे, संतोष मारकड, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली आहे.